सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका ! सात वर्षात सर्वात कमी महागाई भत्ता वाढणार, यावेळी किती वाढणार DA? वाचा…

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे. या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढू शकतो याबाबत एक नवे अपडेट हाती आले आहे.

Updated on -

DA Hike : देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर देशातील 1.2 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे.

या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. दरम्यान यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढू शकतो याबाबत एक नवे अपडेट हाती आले आहे.

किती वाढणार महागाई भत्ता

मीडिया रिपोर्ट नुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआरमधील वाढीचा निर्णय युनियन कॅबिनेटद्वारे होईल. केंद्रीय मंत्रिमंडळ या आठवड्यात महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पण, हे लक्षात घेण्यासारखे आहे की नवीन डीए जानेवारी 2025 पासून लागू होईल, याचा अर्थ असा की कर्मचार्‍यांना वाढीव पगार मिळेल आणि त्यांना दोन महिन्याची थकबाकी देखील मिळेल. अर्थातच महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय या आठवड्यात होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू राहणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी महागाई भत्ता सुधारित केला जातो आणि मार्च महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू केला जात असतो.

यानुसार मार्च महिन्यात सुधारित होणारे महागाई भत्त्याचे दर जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. गेल्या वेळी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.

त्यावेळी हा महागाई भत्ता 50% वरून 53% एवढा झाला आणि ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली. दरम्यान आता या आठवड्यात पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे.

ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (एआयसीपीआय) च्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ निश्चित केली जाणार आहे. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ निश्चित होणार आहे.

मात्र यावेळी या आकडेवारीनुसार डीएमध्ये केवळ 2%वाढ होण्याची शक्यता आहे, जी गेल्या 7 वर्षात सर्वात कमी असेल. जुलै 2018 पासून, सरकारने प्रत्येक वेळी डीए कमीतकमी 3% किंवा 4% ने वाढविले आहे आणि काही प्रसंगी तेथे आणखी वाढ झाली आहे.

मात्र यावेळी महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर जाणार आहे. असे झाल्यास गेल्या सात वर्षातील ही सर्वात कमी महागाई भत्ता वाढ राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe