आज सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (DA) वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार, GR पण निघणार

केंद्र सरकार 14 मार्चला साजरी होणाऱ्या होळी सणापूर्वी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर, DA वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देशभरातील जवळपास 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

Published on -

DA Hike : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीच्या आधी मोठी भेट मिळू शकते. म्हणून जर तुम्ही ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या परिवारातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर, केंद्र सरकार 14 मार्चला साजरी होणाऱ्या होळी सणापूर्वी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज बुधवारी अर्थातच 12 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर, DA वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देशभरातील जवळपास 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता दर काय आहे, महागाई भत्ता आणखी कितीने वाढणार, सदर महागाई भत्ता वाढ कधीपासून लागू होणार? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सरकार दरवर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैसाठी डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते. जानेवारी महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात घेतला जातो अन जुलैपासून लागू होणारी दुसरी वार्षिक पुनरावृत्ती साधारणपणे दिवाळीच्या आसपास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जाहीर केली जाते.

दरम्यान या चालू मार्च महिन्यात जो महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणार आहे ती महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार. खरेतर, गेल्या वेळी डीए वाढवण्यात आला होता तो जुलै 2024 मध्ये, तेव्हा डीए 50% वरून 53% पर्यंत वाढवला गेला होता.

जानेवारी 2024 पासून ची महागाई भत्ता वाढ 7 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने DA 46% वरून 50% पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली होती, जी होळीच्या काही दिवस आधी 25 मार्च 2024 रोजी अधिकृतपणे घोषित करण्यात आली होती.

यावेळी देखील आज महागाई भत्ता वाढी बाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि यानंतर काही दिवसांनी याचा शासन निर्णय निघेल असे म्हटले जात आहे. खरेतर, महागाई भत्ता वाढ ही आयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते.

जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. दरम्यान, डिसेंबर 2024 च्या AICPI-IW डेटानुसार, यावेळी DA 2% ने वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने 16 ऑक्टोबर 2024 रोजी 7 व्या वेतन आयोगांतर्गत DA आणि DR 3% ने वाढवले ​​होते, 1 जुलै 2024 पासून दोन्ही 53% वर नेले होते.

आता सर्वांचे लक्ष पुढील वाढीकडे लागले आहे. या सीपीआयच्या आकडेवारीनुसार यावेळी महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के होणार आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये यावेळी देखील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे म्हटले जात आहे.

म्हणून महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार कि तीन टक्क्यांनी हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पण, सरकारने दरवाढ केल्यास, सुधारित डीए आणि डीआर दर जानेवारी 2025 पासून लागू होतील.

दरवर्षी कर्मचाऱ्यांना सणासुदीला दिलासा देण्यासाठी सरकारने होळीच्या आसपास महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून यावेळी देखील होळीच्या आधी याबाबतचा निर्णय होईल अशी आशा आहे. तथापि, 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीवर कोणतीही चर्चा झाली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe