……तर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5 टक्के महागाई भत्ता वाढ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी मिळणार मोठी गुड न्यूज

Published on -

DA Hike : आपल्यापैकी अनेक जण सरकारी नोकरी करू इच्छित आहेत. कारण म्हणजे सरकारी नोकरदारांना खाजगी कंपन्यांपेक्षा अधिक सवलती मिळतात.

सरकारी नोकरदार मंडळीला पगारा व्यतिरिक्त विविध प्रकारचे भत्ते दिले जातात. यात सगळ्यात मोठा भत्ता म्हणजे महागाई भत्ता. वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सवलत दिली जाते.

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिली वाढ ही जानेवारी महिन्यापासून आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यापासून लागू केली जाते. पण प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा जीआर हा अनुक्रमे मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात जारी केला जातो.

म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा रोख लाभ हा उशिराने मिळतो आणि जेव्हापासून महागाई भत्ता वाढ लागू होते तेव्हा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजेच थकबाकी सुद्धा मिळते.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता वाढ ही एका विशिष्ट सूत्रानुसार मोजली जाते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ ठरते.

दरम्यान आता या नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. जोपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सातवा वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल. दरम्यान जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमधील आकडेवारीनुसार निश्चित होणार आहे.

अशातच आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे यावेळी म्हणजे जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कमाल 5% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

 कधी मिळणार पाच टक्के महागाई भत्ता वाढ

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाईल. मात्र ही महागाई भत्ता वाढत जानेवारी 2026 पासून लागू राहील. म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना त्यावेळी देण्यात येईल.

खरे तर गेल्यावर्षी केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% केला आहे. अर्थात गेल्या वेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला. अशातच आता काही कर्मचारी संघटनांनी यावेळी महागाई भत्ता वाढ तीन ते पाच टक्के दरम्यान राहणार असा अंदाज दिला आहे.

ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मंजीत सिंग पटेल यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली आहे. पटेल यांनी असे सांगितले आहे की डिसेंबर 2025 साठी AICPI-IW जर 147 धरला, तर DA मध्ये सुमारे 3 टक्क्यांची महागाई भत्ता वाढ मंजूर केली जाऊ शकते.

अर्थात तीन टक्क्यांची वाढ पकडली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 61 टक्के होणार आहे. तसेच जर निर्देशांक 148.2 राहिला तर महागाई भत्ता वाढीचा हा आकडा पाच टक्क्यांवर जाणार आहे. पाच टक्के महागाई भत्ता वाढ पकडली तर हा आकडा 63 टक्क्यांवर जाणार आहे.

खरे तर नोव्हेंबर महिन्याचे निर्देशांक 148.2 राहिले आहेत. यामुळे सरकारी कर्मचारी संघटनांनी यावेळी महागाई भत्ता पाच टक्क्यांनी सुद्धा वाढू शकतो असा अंदाज दिला आहे. पण आता जानेवारी महिन्यापासून नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News