सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार मोठी वाढ

Published on -

DA Hike : गेल्या काही दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात.

पण नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित करण्यात येईल.

मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढण्याची शक्यता आहे. आज कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता मिळतोय. पण यामध्ये तीन टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याने हा महागाई भत्ता 58% होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकार याबाबतचा शासन निर्णय जारी करेल. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या पगारा सोबतच याचा रोख लाभ दिला जाणार आहे. पण ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येईल.

अर्थात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे. दिवाळीच्या आधी केंद्रातील मोदी सरकार महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारक यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येईल. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली, तर कर्मचाऱ्यांच मासिक वेतन सुद्धा वाढणार आहे.

एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये असेल तर त्याचा पगार अंदाजे तीन हजार रुपयांनी वाढू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18 हजार रुपये त्याला 55% दराने 9 हजार 900 रुपये महागाई भत्ता मिळतोय.

महागाई भत्ता 58% झाल्यानंतर 18000 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला दहा हजार 440 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. अर्थात अठरा हजार बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात दरमहा 540 रुपयांची वाढ होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe