सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ का रखडली ? कधी होणार DA वाढीची घोषणा ?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच आठवा वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली असून आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी दोन टक्क्यांनी वाढू शकतो.

Updated on -

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासूनच्या महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आहे. खरे तर दरवर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या मुहूर्तावर महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाते. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा वाढवला जातो.

पहिल्यांदा मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळते आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होते. दुसऱ्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होतो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाते.

यावर्षी मात्र मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाला नाही. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शन धारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खरे तर केंद्रातील सरकारी 19 मार्च रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेणार असे म्हटले जात होते मात्र 19 मार्च रोजी असे काही घडले नाही.

सरकारी प्रक्रिया आणि आर्थिक मंजुरीतील दिरंगाईमुळे महागाई भत्त्यात वाढीची घोषणा रखडली असल्याचा दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जर सर्व काही वेळेवर झालं असतं, तर केंद्र सरकारने होळीच्या मुहूर्तावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीची भेट दिली असती.

मात्र, यंदा अजून महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही पण येत्या काही दिवसांनी कधीही या निर्णयाला मंजुरी मिळू शकते आणि लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

असे झाले तर एप्रिल महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार आहे. आता आपण यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबत माहिती पाहूयात.

किती वाढणार महागाई भत्ता

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ ठरत असते. सध्या जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील महागाई भत्ता आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीवर नजर टाकली तर यावेळी महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढणार आहे. असे झाल्यास गेल्या आठ वर्षांमधील ही सर्वात कमी महागाई भत्ता वाढ ठरणार आहे.

आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के दराने महागाई भत्ता वाढ मिळाली होती आता आठ वर्षानंतर पहिल्यांदाच दोन टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर होण्याची शक्यता आहे. यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe