प्रतीक्षा संपली ! बॉक्स ऑफिस गाजवलेला दशावतार चित्रपट ‘या’ तारखेला OTT वर रिलीज होणार, कुठं पाहणार चित्रपट ?

Dashavtar Cinema Release Date : सप्टेंबर महिन्यात दशावतार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झाला. दिलीप प्रभावळकर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेत. त्यांच्या अभिनयाने सगळ्यांनाच वेड लावले. या चित्रपटात कोकणातील परंपरा उत्कृष्टरित्या दाखवण्यात आली आणि चित्रपटाला दिलीप प्रभावळकर यांच्या दिमाखदार अभिनयामुळे एक वेगळी ओळख मिळाली.

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन यांनी साकारली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळालेत. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनिल तावडे, विजय केंकरे असे मराठमोळे कलाकार या चित्रपटात अभिनय करताना दिसलेत.

सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाची दमदार कहानी आणि कलाकारांचा अभिनय त्यामुळे अनेक दिवस हा चित्रपट चित्रपटगृहात हाउसफुल राहिला. बॉक्स ऑफिस वर चित्रपटाने चांगली कामगिरी केली आणि करोडोंचा गल्ला जमवला.

दरम्यान बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी बातमी हाती आली आहे. खरे तर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थेटरमध्ये प्रचंड गर्दी करत आहेत.

मात्र अनेकांना थेटर मध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आलेला नाही आणि असे अनेक प्रेक्षक याच्या ओटीटी रिलीज च्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आलाय.

 ओटीटीवर कधी रिलीज होणार दशावतार?

 मिळालेल्या माहितीनुसार येत्या एका आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा झी 5 या ओटीटी एप्लीकेशन वर रिलीज केला जाणार आहे. खरे तर झी 5 ने या सिनेमाच्या रिलीज चे राईट कधीच विकत घेतले होते.

मात्र या सिनेमाची रिलीज डेट फायनल होत नव्हती. पण आता रिलीज डेट फायनल झाली आहे आणि स्वतः झी फाईव्ह कडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. Zee 5 या OTT प्लॅटफॉर्मवर 14 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

ZEE5 ने आपल्या अधिकृत instagram हँडलवर ‘2025 या वर्षातला सुपरहिट भव्य दिव्य सिनेमा दशावतार 14 नोव्हेंबर 2025 पासून फक्त आपल्या मराठी ZEE5 वर…! असे म्हणतं या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर बघायचा असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

दरम्यान बॉक्स ऑफिस गाजवलेला दशावतार आता ओटीटीवर कशी कामगिरी करतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे. क्रिटिक्स सुद्धा या चित्रपटाची ओटीटी वरील कामगिरी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.