लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता पुन्हा लांबणीवर ! मे महिन्याचे पैसे ‘या’ तारखेला मिळणार, समोर आली मोठी अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात. या योजनेचा मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण दहा हफ्ते पात्र महिलांना मिळाले आहेत आणि लवकरच या योजनेचा अकरावा हप्ता सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन ते तीन मे 2025 दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात मिळाला यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तेव्हाच उपस्थित झाला होता. मात्र सरकार मधील मंत्र्यांकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यातच जमा केला जाईल असे बोलले जात होते. यामुळे 31 मे पर्यंत सर्व महिलांना मे महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र तसे काही झाले नाही मे महिन्याचा हप्ता जून महिना उजाडला तरी सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि आता याच हप्त्याच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे यामुळे मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच वर्ग होईल हे क्लियर झाले आहे. जून महिन्यात वटपौर्णिमाचा सण साजरा होणार आहे आणि याच मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असे बोलले जात आहे. यामुळे खरंच फडणवीस सरकार वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची भेट देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत मिळणार

लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याच्या चर्चा काही मीडिया रिपोर्ट मध्ये सुरू झाल्या आहेत तर दुसरीकडे असे काही मीडिया रिपोर्ट्स आहेत जे की मे आणि जून या दोन्ही हप्त्यांचे पैसे सरकार एकाच वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करू शकते असा दावा करत आहेत. यामुळे खरंच सरकार मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार का ? ही सुद्धा गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. तथापि, या संदर्भात सरकारकडून अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात अकरावा आणि बारावा हप्ता सोबत जमा होणार का? याचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News