Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA आणि HRA ‘इतका’ वाढणार

Published on -

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रीय आणि राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला होता. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली होती.

यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा झाला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली होती. अशातच आता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी 4% वाढणार आहे. AICPI आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महागाई भत्यात आणखी चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्याचा 42 टक्के महागाई भत्ता आता 46% एवढा होणार आहे.

विशेष बाब अशी की केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाकडून देखील महागाई भत्ता वाढ दिली जात आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा करण्यात आला आणि याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 42 टक्के एवढा करण्यात आला आहे. दरम्यान आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% बनणार आहे, यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 46 टक्के एवढा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

केव्हा होणार घोषणा ?
एका मीडिया रिपोर्ट मध्ये असं सांगितलं गेलं आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे याची घोषणा पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात केली जाणार आहे. खरंतर या चालू महिन्यातच याची घोषणा होणार होती मात्र केंद्र शासनाकडून ऑगस्ट महिन्यात याची घोषणा न होता सप्टेंबर महिन्यात याची घोषणा होईल असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.

घरभाडे भत्ता देखील वाढणार?
सदर मीडिया रिपोर्ट नुसार ज्यावेळी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी कर्मचाऱ्यांना एक्स, वाय आणि झेड श्रेणीनुसार घरभाडे भत्ता दिला जात आहे. ही श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या शहरानुसार आहे. या अंतर्गत सध्या X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 27 टक्के, Y मधील 18 टक्के आणि Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9 टक्के एवढा HRA म्हणजे घर भाडे भत्ता दिला जात आहे. पण जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल, तेव्हा HRA देखील अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढेल, असा दावा या मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. याआधी 2021 मध्ये घर भाडे भत्ता वाढवण्यात आला आहे.

महागाई भत्ता वाढल्यानंतर पगारात किती वाढ होणार?
जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी 18000 रुपये असेल तर अशा कर्मचाऱ्याला 46 टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर 8280 रुपये प्रति महिना एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या 42 % नुसार अठरा हजार मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 7560 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळत आहे. अर्थातच 46% महागाई भत्ता झाल्यानंतर पगारात प्रति महिना 720 रुपये एवढी वाढ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe