राज्य कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी! या सणापूर्वी मिळू शकतो महागाई भत्तावाढीचा लाभ, वाचा माहिती

government employees

सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्तावाढीची चर्चा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सातत्याने सुरू असून साधारणपणे जुलै महिन्यापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल अशी शक्यता आहे. अद्याप याबाबतीतला निर्णय झालेला नाही परंतु लवकरच याबाबतीत निर्णय होऊन तीन टक्क्यांची महागाई भत्तावाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

अगदी याच पद्धतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ लागू केला जाईल असे साधारणपणे सांगण्यात येत आहे. जर आपण याबाबतीत जर  अनेक मीडिया रिपोर्टचा आधार घेतला तर यानुसार महाराष्ट्रातील 17 लाख पेक्षा जास्त राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे व जुलै महिन्यापासून याचा लाभ देय राहील.

 सरकारी कर्मचाऱ्यांना किती मिळणार महागाई भत्ता?

सध्या महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यात तीन टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. जर ही तीन टक्क्यांची वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 45 टक्के दराने मागील भत्ता मिळणार आहे व या महागाई भत्ता वाढीच्या अंमलबजावणी सप्टेंबर महिन्याच्या पगारा सोबत म्हणजेच जे नोव्हेंबर महिन्याचे पेमेंट ऑक्टोबर महिन्यात दिले जाईल त्यासोबत मिळेल अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जुलै ते ऑगस्ट या कालावधी दरम्यान महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधित कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणार आहे.

 कधी येऊ शकतो हा निर्णय?

जर आपण याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा विचार केला तर कुठल्याही प्रकारचे अपडेट अजून तरी देण्यात आलेली नाही. परंतु साधारणपणे गणेशोत्सवाला सुरुवात होण्यार असल्यामुळे 19 सप्टेंबरच्या आसपास हा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच यासंबंधीचा जीआर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वीच निर्गमित केली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

राज्य सरकार याबाबतीतला निर्णय येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार असल्याचे बोलले जात असून  केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ दिला जाईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारकडून जर याबाबतीतला निर्णय लवकर घेतला गेला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक सणासुदीच्या निमित्ताने एक मोठी भेट ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe