Oppo Reno 8T : 108MP कॅमेरा आणि प्रीमियम फीचर्स! Oppo च्या 5G फोनवर मिळतेय सर्वात मोठी सवलत, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo Reno 8T : जर तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही कमी बजेटमध्येच Oppo चा शानदार 5G 108MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

अशी ऑफर तुम्हाला Oppo Reno 8T वर मिळत आहे. फ्लिपकार्ट तुम्हाला ऑफर उपलब्ध करून देत आहे. या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये इतकी आहे. हा फोन या सेलमध्ये 23,999 रुपयांना मिळत आहे. तसेच बँक ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 750 रुपयांच्या अतिरिक्त डिस्काउंटसह खरेदी करता येईल. इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला त्याची किंमत 22,500 रुपयांनी कमी करता येईल.

जाणून घ्या Oppo Reno 8T ची फीचर आणि स्पेसिफिकेशन

Oppo च्या या फोनमध्ये 6.7 इंच वक्र AMOLED डिस्प्ले दिला आहे. कंपनीच्या या फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर डिस्प्लेची शिखर ब्राइटनेस पातळी 950 nits इतकी आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा फोन 8 GB LPDDR4X रॅम आणि 128 GB UFS 3.1 स्टोरेज पर्यायात येतो. तर प्रोसेसर म्हणून कंपनी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देते.

वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. 108-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश यात करण्यात करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला या स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

ओप्पोच्या या शानदार स्मार्टफोनची बॅटरी 4800mAh असून ती 67 वॅट सुपरव्हीओओसी चार्जिंगला सपोर्ट करते. याच्या OS बद्दल सांगायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित ColorOS 13 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये कंपनीच्या 3.5mm जॅक आणि USB टाइप-सी पोर्टसह सर्व मानक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.