Defence Sector Share Price : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या तयारीत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या प्रचंड चढ-उतार सुरू आहे. चढ-उतार होत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत.
पण अशा या स्थितीत टॉप ब्रोकरेज कडून देशातील एका सरकारी डिफेन्स सेक्टर कंपनीवर विश्वास दाखवण्यात आला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा स्टॉक आगामी काळात 25 ते 28 टक्क्यांनी वाढू शकतात असा दावा ब्रोकरेज कडून केला जातोय.

अशा स्थितीत आता आपण भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्स साठी टॉप ब्रोकरेज कडून काय टार्गेट प्राईस देण्यात आली आहे अन कोणत्या ब्रोकरेज कडून याला बाय रेटिंग मिळाले आहे याची माहिती पाहूयात.
टॉप ब्रोकरेजने दिली Buy रेटिंग
भारत इलेक्ट्रॉनिकचे स्टॉक सध्या 380 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहेत. दरम्यान या स्टॉक साठी जेपी मॉर्गन ब्रोकरेजकडून ओव्हरवेट रेटिंग देण्यात आले आहे. आधी पण जेपी मॉर्गनकडून या स्टॉक साठी ओव्हरवेट रेटिंग देण्यात आले होते.
जेपी मॉर्गनने या स्टॉक साठी 490 रुपयांची टारगेट प्राईस दिली आहे. ही टारगेट प्राईस सध्याच्या 380 रुपयांच्या तुलनेत 28.9% अधिक आहे. जेफरीजने सुद्धा या स्टॉक ची किंमत आगामी काळात 19.7% पर्यंत वाढू शकते असे म्हटले आहे. जेफरीजने यासाठी बाय रेटिंग दिली आहे.
आधी जेफरीजकडून यासाठी 420 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली होती, पण आता या स्टॉक साठी 455 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. पण, नोमुराने या स्टॉकसाठी न्यूट्रल रेटिंग दिली आहे.
तसेच यासाठी चारशे रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. म्हणजे या टॉप ब्रोकरेजकडून हा स्टॉक सरासरी 25 ते 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असे सांगितले गेले आहे.
स्टॉकची शेअर मार्केटमधील कामगिरी कशी आहे
1 जुलै रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर 436 रुपयांच्या लाईफ टाइम हायवर पोहचला होता. मात्र त्यानंतर या स्टॉकची किंमत 13 टक्क्यांनी कमी झाली आणि सध्या तो 380 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.
या स्टॉकची किंमत गेल्या एका महिन्याच्या काळात नऊ टक्क्यांनी कमी झाली आहे. पण यावर्षी आत्तापर्यंत या स्टॉकने 30 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत 2025 मध्ये, या शेअरने 436 रुपयांचा हाय आणि 240 रुपयांची लो प्राईस गाठली.
2024 मध्ये या स्टॉकने 340 रुपयांची हाय आणि 171 रुपयांची लो प्राईस गाठली. 2023 मध्ये या स्टॉकची हाय प्राईस 185 रुपये आणि लो प्राईस 87 रुपये इतकी होती. म्हणजे 2023 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना चांगले रिटर्न मिळाले आहेत.