Dhurandhar News : भारतात दररोज कोणता ना कोणता चित्रपट प्रदर्शित होत असतो. पण यातील काही चित्रपट अजरामर होतात. दीर्घकाळ अशा चित्रपटांची चर्चा राहते. अलीकडेच रिलीज झालेला धुरंदर अशाच चित्रपटांच्या यादीत आहे आणि तो एक ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे.
5 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला आणि तेव्हापासून हा चित्रपट सतत चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट पाकिस्तानातील लाहोरच्या लियारी भागातील गॅंगवॉरवर आधारित आहे.

यात भारतीय अंडर कव्हर एजंट कशा पद्धतीने पाकिस्तानात जाऊन तेथील अंडरवर्ल्ड मध्ये सक्रिय होतो आणि तिथे होणाऱ्या देशविरोधी कार्यवाहीची माहिती कशा पद्धतीने भारतात पोहोचवतो याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
हा एक स्पाय चित्रपट आहे. यामध्ये मुख्य भूमिका रणवीर सिंह कडे आहे तर अक्षय खन्ना यामध्ये आपल्याला निगेटिव्ह रोलमध्ये दिसतो. पण चित्रपट रिलीज झाल्यापासून मुख्य भूमिकेपेक्षा निगेटिव्ह रोलची अधिक चर्चा आहे.
अक्षय खन्नाची दर्जेदार भूमिका या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना रणवीर सिंह सोबतच संजय दत्त आर माधवन अर्जुन रामपाल सारा अर्जुन असे बडे स्टार आपल्याला पाहायला मिळतात.
चित्रपटातील सर्वच स्टार्सनी जोरदार अभिनय केलाय. यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. खरंतर चित्रपटाच्या रिलीज ला आता चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे पण तरीही याची क्रेझ कायम असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 867 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
फक्त भारतातच नाही तर हा चित्रपट विदेशात सुद्धा धुमाकूळ घालतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाला काही देशांमध्ये बंदी आहे. पाकिस्तान व काही आखाती देशांनी या चित्रपटात दाखवलेल्या काही संवेदनशील विषयांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. या चित्रपटातील गाणे पाकिस्तान मध्ये ट्रेंड करतायेत.
तसेच अनेकांनी असा दावा केला आहे की पाकिस्तानातील बहुतांशी लोकांनी पायऱसीच्या माध्यमातून हा चित्रपट पाहिलेला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची संभाव्य रिलीज डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या भागाला जसा रिस्पॉन्स मिळाला ते पाहून याचा दुसरा भाग सुद्धा जबरदस्त हिट ठरण्याची शक्यता आहे.
धुरंदर 2 पण बॉक्स ऑफिस गाजवणार !
धुरंदरच्या यशानंतर लवकरच धुरंदर दोन सुद्धा प्रदर्शित होणार आहे. यावर्षी धुरंदर चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुरंदर 2 हा चित्रपट दोन मार्च 2026 रोजी प्रदर्शित केला जाऊ शकतो. आता आपण धुरंदर ओटीटीवर कधी येणार याची माहिती पाहूयात.
नेटफ्लिक्सवर घालणार धुमाकूळ
बॉक्स ऑफिस नंतर लवकरच धुरंदर आपल्याला नेटफ्लिक्स वर दिसणार आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पण मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही अजून थेटर मध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला थेटर मध्ये जाऊन हा चित्रपट पाहता येणार नसेल आणि याच्या ओटीटी रिलीजची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. कारण की हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अशी माहिती समोर आली आहे.
अद्याप तारीख फिक्स नाही पण या दिवसापासून हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध होईल असा दावा होतोय. नेटफ्लिक्सने जवळपास 285 कोटी रुपयांमध्ये या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाचे राईट विकत घेतलेले आहेत.
यामुळे हा चित्रपट नेटफ्लिक्स वर येणार हे फिक्स आहे पण तारीख अजून ठरलेली नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर साधारणता 45 ते 50 दिवसांनी चित्रपटाची ओटीटी स्क्रीनिंग होते. यानुसार हा चित्रपट 30 जानेवारीपासून OTT वर दाखवला जाईल असा दावा केला जात आहे. निर्मात्यांनी अजून याच्या ओटीटी रिलीजची तारीख मात्र काही ठरवलेली नाही.













