बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता धुरंधर चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ! कधी रिलीज होणार चित्रपट?

Published on -

Dhurandhar OTT Release Update : सध्या सोशल मीडियामध्ये तसेच प्रसार माध्यमांमध्ये एका चित्रपटाची विशेष चर्चा सुरू आहे आणि तो चित्रपट म्हणजेच धुरंधर. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल व सारा अर्जुन असे एक से बढकर एक कलाकार या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतात.

चित्रपटातील स्टारकास्ट फार मोठी आहे आणि प्रचंड हुन्नरी कलाकार यामध्ये आपल्या कलेची छाप सोडताना दिसतायेत. चित्रपटात सर्वच कलाकारांनी उत्तम काम केल आहे मात्र एका व्यक्तीची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि या व्यक्तीने नकारात्मक भूमिका असून सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेता येऊ शकते हे सिद्ध करून दाखवलंय.

चित्रपटात निगेटिव्ह रोल पण आपल्या अभिनयाने चित्रपटातील हिरोच्या कामगिरीला साईडलाईन करणारा अक्षय खन्ना सध्या भाव खातोय. सोशल मीडियामध्ये त्याचे डान्स मूव्हज आणि अभिनय सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

चित्रपटात नायकाची भूमिका रणवीर सिंह निभावतोय, रणवीर सिंह याने बाजीराव मस्तानी मध्ये जशी दमदार अॅक्टींग केली होती तशीच अॅक्टींग तो या पण चित्रपटात करतोय मात्र अक्षय खन्नाच्या अभिनयापुढे तो काहीसा बॅकफूटवर फेकला गेलाय.

असो धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. अक्षय खन्ना सोबतच सर्वच स्टार कास्टचे यावेळी कौतुक केले जात आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत करोड रुपयांची कमाई केली आहे आणि हा चित्रपट 2025 चा एक मोठा हिट ठरण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 230 कोटी रुपयांचा खर्च झाला असून आत्तापर्यंत धुरंदरने भारतामध्ये 126.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे तर संपूर्ण जगात 193 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, जर तुम्हाला काही कारणास्तव हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहता येणे अशक्य असेल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे संकेत मिळाले आहेत.

चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग साठी चित्रपट निर्माता आदित्य धरने नेटफ्लिक्ससोबत 130 कोटी रुपयांमध्ये करार केला आहे. दरम्यान हा चित्रपट कधीपर्यंत नेटफ्लिक्सवर रिलीज होणार याची एक संभाव्य तारीख सुद्धा समोर येत आहे.

OTT वर कधी रिलीज होणार चित्रपट?

कोणताही चित्रपट रिलीज झाल्यानंतर म्हणजेच थेटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर साधारणता दोन सव्वा दोन महिन्यांच्या नंतर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतो.

हा आतापर्यंतचा ट्रेंड आहे आणि हाच ट्रेंड धुरंदर सुद्धा फॉलो करू शकतो किंबहुना यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो कारण की हा चित्रपट एक मोठा हिट ठरलेला आहे. यामुळे धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News