बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा ! पण महागाई भत्ता वाढी संदर्भात आली मोठी गुड न्युज, कधी आणि किती वाढणार DA? वाचा सविस्तर

काल अर्थातच 23 जुलै 2024 ला केंद्रातील सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत हा बजेट मांडला. या बजेटमध्ये सरकारने अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.

मात्र सरकारी कर्मचाऱ्यांची या बजेटमध्ये पुन्हा एकदा निराशा झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बजेटमध्ये कोणतीच मोठी घोषणा झाली नाही. याउलट सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशेवर बजेटचा एक दिवस आधीच पाणी फेरले गेले. त्याचं झालं असं की बजेटच्या एक दिवस आधीच केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. बजेटच्या एक दिवस आधीच म्हणजेच 22 जुलैला संसदेत केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना संदर्भात आपली भूमिका जाहीर केली.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, संसदेत सरकारला आठवा वेतन आयोग संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. याच्या उत्तरात सरकारकडून सध्या स्थितीला आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे म्हटले गेले. याचप्रमाणे जुनी पेन्शन योजनेबाबतही सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करणे अशक्य असल्याचे सांगितले. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा झाली.

दरम्यान आता बजेट सादर झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ही गुड न्यूज आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सुधारित केला जात असतो.

यानुसार जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याबाबतचा मोठा निर्णय केंद्रातील सरकारने घेतला आहे. यानुसार सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. दरम्यान आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.

हा महागाई भत्ता एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जाणार आहे. आतापर्यंत एआयसीपीआयची जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जुलै अखेरीस जून महिन्याची आकडेवारी समोर येणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार आणि संभाव्य आकडेवारी लक्षात घेता यावेळी म्हणजे जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार अशी शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित असून यामुळे महागाई भत्ता 53 टक्क्यांवर जाणार आहे.

मात्र याबाबतची घोषणा ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. मात्र ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासूनच लागू राहणार आहे. अर्थातच ज्यावेळी याची घोषणा होईल त्यावेळी महागाई भत्ता फरकाची रक्कमही केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यामुळे बजेट मधून सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झाली असली तरी देखील महागाई भत्ता वाढीमुळे त्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.