Anant Ambani : सध्या मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून सध्या त्यांच्या गुजरातमधील जामनगरमध्ये १-३ मार्च रोजी होणाऱ्या प्री-वेडिंग पार्टीची जोरदार चर्चा सुरु आहे.
लवकरच राधिका मर्चटसोबत त्यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग पार्टी आजपासून तीन तारखेपर्यंत असणार आहे.
या सोहळ्यात देश-विदेशातील सुमारे १,००० लोक सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेते आणि सेलिब्रिटी अनंत-राधिका यांना आशीर्वाद देतील.
सध्या चर्चा आहे या दिमाखदार सोहळ्यामधील खास फूड मेनूबद्दल. प्रत्येक पाहुण्याला आवडीनुसार जेवण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणाबाबत पाहुण्यांच्या आवडीनिवडींची विशेष काळजी घेतली जाईल.
पाहुण्यांना आहारात ज्या गोष्टी नकोत त्या टाळल्या जातील. त्यामुळे प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांच्या टीमकडून त्यांच्या खाद्यपदार्थाच्या आवडीनिवडीबाबत माहिती मागवण्यात आली आहे.
इंदूरमधील २५ शेफची खास टीम
प्री-वेडिंगसाठी इंदूरमधील २५ शेफची खास टीम तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कार्यक्रमात पारशी, थाई, मेक्सिकन, जपानी खाद्यपदार्थाचाही समावेश करण्यात आला आहे.
पॅन एशिया पॅलेटवर लक्ष केंद्रित केले जाईल. तीन दिवस पाहुण्यांना २५०० प्रकारचे पदार्थ खाता येतील. यामध्ये न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि स्नॅक्सचा समावेश असेल.
ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये ७० पर्याय
ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये ७० पर्याय असतील. दुपारच्या जेवणात २५० आणि रात्रीच्या जेवणात २५० प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जातील. कार्यक्रमात कोणताही पदार्थ पुन्हा दिला जाणार नाही.
शाकाहारी खाणाऱ्यांच्या गरजांचीही काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदार्थांची रेलचेल तर आहेच शिवाय या पार्टीचा आनंद लुटणाऱ्या पाहुण्यांसाठी मध्यरात्री फराळाची व्यवस्था असणार आहे.