Dividend Stock:- सध्या शेअर मार्केटमध्ये बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून भागधारकांसाठी अंतिम लाभांश जाहीर करण्यात येत असून त्यामुळे त्या त्या कंपन्यांच्या भागधारकांना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अगदी याच प्रकारे औषध निर्माण क्षेत्रातील अग्रगण्य असलेली फार्मा कंपनी कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेडने देखील आर्थिक वर्ष 2024-25 करिता अंतिम लाभांश देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी असलेली रेकॉर्ड डेट देखील निश्चित करण्यात आलेली आहे. प्राप्त माहितीनुसार ही कंपनी आजपर्यंतचा दुसरा आणि सर्वात मोठा लाभांश भागधारकांना देणार आहे. कंपनीने याआधी दिलेला पहिला लाभांश बघितला तर तो प्रतिशेअर 8.75 रुपये इतका होता.
आता किती मिळणार लाभांश आणि रेकॉर्ड डेट काय?
कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2024-25 करिता मे महिन्यामध्ये अंतिम लाभांश जाहीर करण्यात आलेला होता व तो प्रति 25 शेअरसाठी 10.70 रुपये इतका असणार आहे. यासंबंधीची शिफारस कंपनीच्या संचालक मंडळाने केली आहे व कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीनंतरच हा लाभांश दिला जाणार आहे. कंपनीने यासाठीची रेकॉर्ड डेट 3 सप्टेंबर 2025 इतकी जाहीर केलेली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना हा लाभ मिळणार आहे.

कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीचा शेअरचा परफॉर्मन्स
जर आपण या कंपनीच्या शेअरचा सध्याच्या परफॉर्मन्स बघितला तर शुक्रवारी त्यामध्ये घसरण पाहायला मिळाली व 1681.60 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप साधारणपणे 17837.06 कोटी रुपये आहे. तसेच या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची कामगिरी बघितली तर त्याची उचांकी पातळी 2664 रुपये तर नीचांकी पातळी 1345 रुपये इतकी राहिली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात या शेअरच्या किमतीत 6.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे व एका वर्षात 5.80% परतावा दिला आहे.