Dividend Stock : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तिमाही निकाला सोबतच कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हिडेंड देण्याची सुद्धा घोषणा केली जात आहे.
दरम्यान आज पर्सनल केअर कंपनी जिलेट इंडियाने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तसेच या कंपनीकडून आज एक्स डिव्हीडंट ट्रेंड सुद्धा केला जात आहे. यामुळे या कंपनीचे स्टॉक आज फोकस मध्ये आले आहेत.

आज या शेअरच्या किमतीत 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून यामुळे या कंपनीतील वेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. जिलेट इंडियाचे शेअर्स आज बीएसईवर 14.68 टक्क्यांनी वाढले आहेत. आज या कंपनीचे स्टॉक 8,549.80 रुपयांवर व्यवहार करत होते.
महत्वाची बाब म्हणजे या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. म्हणूनच आज आपण या कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिले आहेत आणि ही कंपनी किती लाभांश देणार आहे याचा एक आढावा घेणार आहोत.
कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत?
या कंपनीच्या तिमाही निकालाबाबत बोलायचं झाल तर 125.97 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीचा निवड नफा हा 21 टक्क्यांनी वाढला असल्याचे या तिमाही निकालातून समोर आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तिमाहीत कंपनीला 103.95 कोटींचा नफा मिळाला होता. कंपनीचा महसूल सुद्धा 7.3 टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 685.55 कोटी रुपये इतका नमूद करण्यात आला आहे.
जिलेट इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 65 रुपये लाभांश जाहीर केला होता. यासाठी कंपनीने 19 फेब्रुवारी 2025 रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने 10 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत या लाभांशाची घोषणा केली होती. तेव्हापासून या कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात फोकस मध्ये आले आहेत.