Dividend Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईचे सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका सिगारेट बनवणाऱ्या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गोडफ्रे फिलिप्स इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 17 रुपये इतका मोठा अंतरिम लाभांश देणार आहे. 2 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर तब्बल 850% इतका लाभांश कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे.

यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट सुद्धा फायनल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने लाभांशसाठी 10 नोव्हेंबर ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून फायनल केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने याआधी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला 60 रुपयांचा अंतरिम लाभांश मंजूर केला होता. आता पुन्हा एकदा कंपनी 17 रुपयांचा लाभांश देणार आहे आणि यासाठी दहा नोव्हेंबर ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
तसेच लाभांश वितरण 3 नोव्हेंबर 2025 पासून 30 दिवसांच्या आत दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या कंपनीने सप्टेंबर महिन्यात आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर सुद्धा दिले आहेत. 2:1 या प्रमाणात कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे.
बोनस शेअर्स नंतर आता कंपनीकडून लाभांश दिले जाणार असल्याने या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. या कंपनीचा स्टॉक सध्या तीन हजार 31 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. महत्त्वाची बाब म्हणजे या कंपनीचे स्टॉक गेल्या काही महिन्यांमध्ये 79% पर्यंत वाढले आहेत.
दरम्यान आता कंपनीच्या लाभांशाच्या घोषणेनंतर याच्या स्टॉक मध्ये कमालीची वाढ होत असून उद्यापर्यंत जे गुंतवणूकदार या कंपनीचे स्टॉक खरेदी करतील त्यांना लाभांश वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजे रेकॉर्ड डेट 10 नोव्हेंबर असली तरी देखील 10 नोव्हेंबर रोजी स्टॉक खरेदी करणाऱ्यांना या लाभांशाचा लाभ मिळणार नाही.