Dividend Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे विशेषता जे गुंतवणूकदार डिविडेंट देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्यासाठी ही बातमी अधिक ठस ठरणार आहे. डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडंड देण्याची मोठी घोषणा सुद्धा करत आहेत.
![Dividend Stock](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Dividend-Stock.jpeg)
प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा डिव्हीडंड अर्थातच लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी एका शेअरवर 110 रुपये लाभांश देत आहे. विशेष बाब अशी की यासाठी रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
कधी आहे रेकॉर्ड डेट
प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडने एका शेअरवर 110 रुपयांचा लाभांश देण्याची मोठी घोषणा केली असून यासाठी 20 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. अर्थातच या दिवशी ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच लाभांशाचा लाभ मिळणार आहे.
विशेष बाब अशी की कंपनी पात्र गुंतवणूकदारांना 7 मार्च किंवा त्यापूर्वी लाभांश देईल. दरम्यान कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला मोठी माहिती दिली आहे. या माहितीनुसार, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 110 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधीही दिला होता लाभांश
गेल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये कंपनीने शेअर बाजारात दोनदा एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये गुंतवणूकदारांना एका शेअरवर 95 रुपये लाभांश दिला होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीने 100 रुपये अंतरिम लाभांश आणि 60 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश दिला होता.
दरम्यान आता पुन्हा एकदा कंपनीकडून लाभांश देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सध्या हा स्टॉक फोकस मध्ये आला असून गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
शेअर बाजारातील स्टॉकची कामगिरी कशी आहे?
शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचा शेअर 13855.55 रुपयांवर होता. पण, या स्टॉकने गेल्या काही महिन्यांमध्ये विशेष कामगिरी केलेली नाही. कंपनीचे स्टॉक शुक्रवारी 0.63 टक्क्यांनी घसरले होते. तसेच गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किमती 17 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
त्याच वेळी, एक वर्षापासून कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 16 टक्के नफा मिळाला आहे. पाच वर्षांचा विचार केला असता गेल्या पाच वर्षांमध्ये या कंपनीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा दिला आहे.