महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 31 हजार रुपयांचा बोनस ! वाचा डिटेल्स

Published on -

Diwali Bonus : दीपोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि आता सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची आतुरता लागली आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आणि कंपन्यांकडून मोठा बोनस दिला जात असतो. सरकारी कर्मचाऱ्यांनाही आपापल्या आस्थापनांकडून बोनस देण्यात येतो आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरा होते.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला होता. सागरी मंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना देखील मोठा बोनस मिळाला होता. दरम्यान आता बीएमसी म्हणजेच मुंबई महानगरपालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

या संबंधित कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून मोठा बोनस मंजूर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. CM, DyCM यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हजारो महापालिका कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. या वर्षी बोनस रक्कम २ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

खरंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ५१ हजार रुपयांचा बोनस मिळाला अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. पण सरकारने प्रत्यक्षात एकतीस हजाराचा बोनस दिलाय. त्यामुळे काही प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, अनुदान प्राप्त आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण सेवक या सर्वांना ३१ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे.

तसेच सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून १४ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ५ हजार रुपयांची भेट जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्व स्तरांवरील कर्मचारी वर्गाचा उत्साह वाढला आहे.

याशिवाय, मुंबईबरोबरच इतर महापालिकांनीदेखील दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. BEST कर्मचाऱ्यांना देखील ३१ हजार रुपये, ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपये, तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल ३४,५०० रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत की, ही बोनस रक्कम तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe