महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट 

Published on -

Diwali Bonus : एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या वर्षी सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. सानुग्रह अनुदान म्हणून यंदा महामंडळात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6000 रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय देण्यात आला असून यासाठीचा आवश्यक निधी शासनाकडून लवकरच उपलब्ध होणार आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिगृहा येथे एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची बैठक संपन्न झाली.

मुंबई येथील मंडळाच्या कार्यालयात ही बैठक संपन्न झाली असून या बैठकीत मंत्री राणे यांनी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्ट वर कार्यरत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे.

दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मंडळात बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना प्रथमच प्रत्येकी 20,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय.

यामुळे आस्थापनावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. कंत्राटी कर्मचारी देखील मंडळाच्या या निर्णयामुळे विशेष प्रसन्न आहेत. दिवाळीनिमित्ताने मंडळातील कार्यरत अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याने यावर्षी त्यांची दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरा होईल अशी आशा आहे.

या निर्णयामुळे मंडळातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. यामुळे मंडळातील कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News