ऐकलंत का, दिवाळीत चुकूनही ‘या’ वस्तू दान करू नका; नाहीतर….

Published on -

Diwali Secrets : सध्या संपूर्ण देशात दिपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आज लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. आज माता लक्ष्मीची पूजा करून दिवाळी सणाचा एक मोठा पर्व साजरा होणार आहे. खरतर दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण.

या काळात नवीन अलंकार, कपडे खरेदी केले जातात. अनेकजण दिवाळीच्या काळात नवीन कामाला सुरुवात करतात. कोणी नवीन वाहन खरेदी करते तर कोणी नवीन मालमत्ता खरेदी करते.

अनेकांनी दिवाळीच्या काळात नवीन व्यवसाय देखील सुरू केले आहेत. अर्थातच या शुभ प्रसंगी चांगल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाते. पण दिवाळीच्या काळात चुकूनही काही गोष्टींचे दान करू नये असे सांगितले गेले आहे. अशा परिस्थितीत आज आपण दिवाळीमध्ये कोणत्या गोष्टींचे दान करू नये याबाबत माहिती पाहणार आहोत.

काळ्या रंगाच्या वस्तू : दिवाळीला काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत तसेच काळ्या रंगाची कोणतीही वस्तू दान करू नये असे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे.

ब्लॅक कलर हा नकारात्मकता दर्शवतो. म्हणून याच्या खरेदीने कुटुंबात नकारात्मकता वाढू शकते. हेच कारण आहे की ब्लॅक कलरच्या वस्तू दिवाळीत खरेदी करू नये तसेच या वस्तू दान करू नये.

तेल आणि तूप : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या सणात अनेक जण दानधर्म करतात. पण योग्य वस्तूंचे दान करणे देखील आवश्यक असते. शास्त्रानुसार दिवाळीच्या काळात तेल आणि तूप सारख्या ज्वलनशील वस्तू दान करू नयेत. अशा वस्तू दिवाळीच्या काळात दान केल्यात तर घरात दरिद्री येण्याची शक्यता असते.

लोखंडी वस्तू : शास्त्रानुसार दिवाळीच्या काळात लोखंडी वस्तू दान करणे अशुभ मानले गेले आहे. फक्त दानच नाही तर लोखंडाची वस्तू उसने देणे सुद्धा अशुभ मानले जाते. दिवाळीमध्ये लोखंडाच्या वस्तू दान करू नये यामुळे दरिद्री येण्याची भीती असते.

मीठ : मीठ हा अन्नातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ. जेवणात मीठ नसेल तर ते जेवण बेचव असते. मात्र हे मीठ कधीही दान करू नये. मीठ उसने सुद्धा देऊ नये. दिवाळीच्या काळात मीठ दान केले तर नातेसंबंधात दुरावा येण्याची शक्यता असते.

पैसे : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. माता लक्ष्मीची आराधना करून सुख-समृद्धीची प्रार्थना आपण सारे जण करणार आहोत. पण दिवाळीच्या दिवशी तसेच संध्याकाळी पैसे देणे अशुभ मानले जाते. दिवाळी काळात आणि सायंकाळी पैशांचे व्यवहार करू नयेत असे शास्त्रात म्हटले गेले आहे.

कोणत्याही सणाच्या दिवशी घरातून पैसे बाहेर पाठवू नयेत किंवा कोणतेही थकित रक्कम या दिवशी भरणे टाळावे. जर या काळात घरातून बाहेर पैसे गेले तर माता लक्ष्मी रुष्ट होते. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि दरिद्री येण्याची भीती असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News