DMart Discount Offer : दिवाळीत सगळीकडे डिस्काउंट ऑफर मिळत होता. अमेझॉन फ्लिपकार्ट पासून तर डी मार्ट पर्यंत सगळ्याच ठिकाणी ग्राहकांना मोठा डिस्काउंट मिळत होता आणि यामुळे अनेकांनी दिवाळीत जबरदस्त खरेदी सुद्धा केली.
दरम्यान, दिवाळीचा सण संपलाय पण अजूनही डिस्काउंट ऑफरचा धडाका सुरूच आहे. डी मार्ट मध्ये या चालू नोव्हेंबर महिन्यात सुद्धा 70% पर्यंतची डिस्काउंट ऑफर सुरू आहे. येथे काही वस्तूंवर ग्राहकांना तब्बल 70% डिस्काउंट दिला जातोय, यामुळे इथे नोव्हेंबर महिन्यातही खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे जर तुम्हीही डीमार्टमध्ये खरेदी करत असाल तर नक्कीच ही तुमच्यासाठी एक मोठी संधी राहणार आहे. डी मार्ट मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
या सुपर मार्केटमध्ये खरे तर बारा महिने सेल असते. पण यावर्षी येथे दिवाळीनंतर सुद्धा 70 – 80 टक्के डिस्काउंट ऑफर मिळतोय. या डिस्काउंट ऑफर मध्ये दैनिक गरजेच्या, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.
आता आपण कोणत्या वस्तूंवर किती डिस्काउंट मिळतोय याबाबतची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.
कोणत्या वस्तूंवर मिळतोय 70 – 80 टक्के डिस्काउंट?
डीमार्ट मध्ये सध्या ग्रोसरी म्हणजेच किराणा सामानावर 50% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच डेअरी प्रोडक्ट्सवर म्हणजे पनीर, ताक, दही अशा वस्तूंवर 40% डिस्काउंट मिळतोय. घरातील स्वच्छतेच्या वस्तूंवर सुद्धा या सुपर मार्केटमध्ये 60% डिस्काउंट मिळत आहे.
डिटर्जंट पावडर, साबण आणि क्लिनिंग स्प्रेच्या पॅकवर ग्राहकांना बाय वन गेट वन फ्री ऑफर सुद्धा दिली जात आहे. तसेच या डिस्काउंट ऑफर मध्ये पर्सनल केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट वर सर्वाधिक लाभ दिला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही या सुपर मार्केटमध्ये शॅम्पू, कंडिशनर, डिओडरंट आणि स्किन केअर प्रोडक्ट्सवर 70 टक्के डिस्काउंट मिळवण्यास पात्र राहणार आहात. तसेच लोशन आणि क्रीमच्या कॉम्बो पॅकवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक सुद्धा दिला जाणार आहे.
परफ्यूम आणि कोस्मेटिक्सवर पण यावेळी 30 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर तर यावेळी सर्वाधिक म्हणजेच 80% डिस्काउंट मिळतोय. फॅन्स, आयरन आणि लाइट्स अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर यावेळी 80% डिस्काउंट मिळतोय. खरं तर आज तुळशी विवाह आहे.
तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर लग्न सराईचा सिझन सुरू होतो. अशा या सीझनमध्ये आता डी मार्ट मध्ये ग्राहकांना 80% पर्यंत डिस्काउंट उपलब्ध करून दिला जाणार असल्याने सर्वसामान्यांच्या हजारो रुपयांची बचत मात्र होणार आहे.













