DMart Employee News : अनेकांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. कारण की आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो. मल्टिनॅशनल आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज ऑफर केले जाते.
त्यामुळे अनेकजण मल्टिनॅशनल आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहतात. पण फक्त आयटी कंपन्यांमध्येच कर्मचाऱ्यांना चांगले लाभ मिळतात असे नाही तर आता काही इतरही सेक्टरमधील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लाभ पुरवत आहेत.

डी मार्ट ही भारतातील एक लोकप्रिय रिटेल कंपनी असून यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आयटी वाल्या प्रमाणेच सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. खरे तर अलीकडे डी मार्टची क्रेज अधिक वाढली आहे.
डी मार्ट आता देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहचले आहे. अलीकडील पाच-दहा वर्षांमध्ये या कंपनीने रिटेल क्षेत्रात एक दबदबा तयार केला आहे. पण डी मार्ट ला मिळालेलं हे यश कुठे ना कुठे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सुद्धा आहे.
यामुळे डी मार्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे लाभ देखील दिले जातात. दरम्यान आज आपण डी मार्ट च्या कर्मचाऱ्यांना पगारा व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींचा लाभ मिळतो? याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डी मार्ट कर्मचाऱ्यांना मिळतात या सुविधा
PF आणि ग्रॅच्यूटीचा लाभ मिळतो : डी मार्ट च्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून पीएफ आणि ग्रॅच्यूटीचा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक हिस्सा पीएफ अकाउंट मध्ये जमा केला जातो आणि तेवढाच हिस्सा कंपनी सुद्धा जमा करते.
यामुळे नोकरी सोडल्यानंतर किंवा विवाह आजारपण घर बांधणे अशा महत्त्वाच्या कामांच्या वेळी कर्मचाऱ्यांना एक मोठी रक्कम पीएफ अकाउंट मधून मिळते.
सोबतच नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युईटीचा पण लाभ मिळतो. ग्रॅच्युईटीच्या नव्या नियमानुसार आता फक्त बारा महिने काम केल्यानंतर सुद्धा या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकणार आहे.
मासिक खर्च वाचतो : येथील कर्मचाऱ्यांना कंपनीकडून शॉपिंगवर खास सवलत दिली जाते.
बोनस : येथील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बोनसचा सुद्धा लाभ दिला जातो. येथे कामानुसार बोनस मिळतो.
विमा योजनेचा लाभ : कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेचा सुद्धा लाभ दिला जातो.
वेळोवेळी प्रमोशन मिळते : डी मार्ट च्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी आपल्याच कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यावर अधिक लक्ष देते. येथे सेल्स असोसिएट पासून सुरुवात केलेले कित्येक कर्मचारी थेट मॅनेजमेंट लेव्हलपर्यंत पोहोचलेले आहेत.













