DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी! डीमार्टमध्ये सर्वात मोठा सेल केव्हा असतो? वाचा सविस्तर

Published on -

DMart News : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरू आहे. या सेलमुळे ऑनलाईन खरेदी वाढली आहे. अनेकजण मोबाईल एसी फ्रेश टीव्ही अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या साइट्स वरून मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

महत्वाची बाब म्हणजे इतरही प्रॉडक्टवर येथे मोठा डिस्काउंट मिळतो. मग आता अनेकांच्या माध्यमातून Dmart मध्ये कधी डिस्काउंट मिळतो असा प्रश्न विचारला जातोय.

अशा स्थितीत आता आपण Dmart मध्ये सगळ्यात मोठा डिस्काउंट कधी मिळतो? याची माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर, ग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.

डीमार्टचा सर्वात मोठा सेल दिवाळीच्या तोंडावर सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सेलमध्ये ग्राहकांना तब्बल 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

धान्य, ग्रोसरी, खाद्यपदार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तूंपासून ते ब्युटी आयटम्सपर्यंत सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत.

दिवाळी सेलमध्ये बाय वन गेट वन फ्री अशा आकर्षक ऑफर्समुळे लाखो ग्राहक दुकानांकडे आकर्षित होतात. मागील वर्षी तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी या सेलचा लाभ घेतला होता.

यंदा हा विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.डीमार्टचा व्यवसाय मॉडेल ‘एव्हरीडे लो प्राईस’वर आधारित असला तरी, खरेदीदारांसाठी सर्वाधिक फायद्याचे दिवस म्हणजे वीकेंड सेल आणि सोमवार क्लिनअप डिस्काउंट.

शुक्रवारपासून रविवारपर्यंत चालणाऱ्या वीकेंड सेलमध्ये एफएमसीजी उत्पादने, किराणा, कपडे आणि घरगुती वस्तूंवर 20 – 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. अनेक ठिकाणी बाय वन गेट वन फ्री ऑफरही लागू असते.

तर सोमवारच्या स्टॉक क्लिअरन्समध्ये जुन्या वस्तूंवर 30 – 40 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे. सण-उत्सव काळात ही सूट आणखी वाढते. दिवाळी, होळी, ख्रिसमस आणि नववर्षाच्या खरेदीसाठी डीमार्टचा सेल ग्राहकांमध्ये हिट ठरतो.

विशेष म्हणजे, बल्क खरेदी केल्यास सवलत अधिक मिळते. तेल, ड्रायफ्रूट्स आणि बेबी केअर उत्पादनांवर तब्बल 50 टक्क्यांहून जास्त सूट मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, डीमार्ट रेडी अॅपवरून ऑनलाइन ऑर्डर केल्यास मोफत होम डिलिव्हरीची सुविधा ग्राहकांना दिली जाते. या सेलमुळे पुढील महिन्यात डीमार्टला ग्राहकांची जबरदस्त गर्दी राहणार हे निश्चित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe