DMart च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! मकर संक्रांति निमित्ताने डीमार्टमध्ये ‘या’ वस्तूंवर मिळतोय 80% डिस्काउंट, वाचा सविस्तर

Published on -

DMart Shopping News : येत्या काही दिवसांनी संपूर्ण देशभर मकर संक्रांतीचा मोठा सण साजरा होणार आहे. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होणार असून या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजल्या आहेत.

दरम्यान जर तुम्ही ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने शॉपिंगसाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी डी मार्ट एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. कारण मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून देशातील आघाडीची रिटेल साखळी डीमार्ट (DMart) ने विशेष डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे.

जानेवारी 2026 मध्ये डी मार्ट कडून आपल्या ग्राहकांसाठी खास सवलती आणि विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी लागणाऱ्या तिळ-गुळापासून ते महिन्याच्या किराण्यापर्यंत आणि घरगुती उपकरणांपर्यंत अशा विविध वस्तूंवर डी मार्ट मध्ये सेल सुरू असून यामुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये शॉपिंग चा आनंद घेता येणार आहे.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य ग्राहकांना डी मार्ट मध्ये कमी पैशात वस्तू उपलब्ध होणार असून यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होणार आहे. दरम्यान आता आपण डी मार्ट मध्ये कोणत्या वस्तूंवर डिस्काउंट दिला जातो याची माहिती येथे जाणून घेणार आहोत.   

या वस्तूंवर मिळणार विशेष सवलत 

संक्रांतीचा मुख्य आकर्षण असलेल्या तिळ-गुळाच्या साहित्यावर डीमार्टने विशेष भर दिला आहे. पांढरे तीळ, गावरान गूळ आणि शेंगदाणे यांच्या खरेदीवर 10 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. विशेषतः पॉलिपॅक गूळ, सुकं खोबरं आणि शेंगदाण्यांवर आकर्षक दर उपलब्ध आहेत.

तसेच, घरी लाडू बनवण्यास वेळ नसेल अशा ग्राहकांसाठी ‘DMart Premia’ ब्रँडचे रेडीमेड तीळ-गूळ लाडू आणि चिक्कीवर ‘Buy 1 Get 1 Free’ सारख्या ऑफर्स दिल्या जात आहेत./महिन्याचा किराणा खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठीही डीमार्टची संक्रांती ऑफर फायदेशीर ठरणार आहे.

शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या 5 लिटर कॅनवर MRP पेक्षा मोठी सूट दिली जात आहे. याशिवाय बासमती तांदूळ, तुरीची डाळ आणि मूग डाळीवर विशेष दर लागू करण्यात आले असून सणाचे जेवण अधिक किफायतशीर होणार आहे.

सणानिमित्त घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मिक्सर-ग्राइंडर, फूड प्रोसेसर यांसारख्या किचन अप्लायन्सेसवर 20 ते 30 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. नॉन-स्टिक कढई, तवा आणि कुकरच्या सेटवर बंडल ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मकर संक्रांतीला हळदी-कुंकवाचे विशेष महत्त्व असल्याने महिलांसाठी वाण साहित्यावरही डीमार्टने खास सवलती दिल्या आहेत. स्टीलचे डबे, वाट्या, प्लास्टिक कंटेनर्स आणि गृहसजावटीच्या वस्तू 29 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच साबण, शॅम्पू आणि इतर सौंदर्यप्रसाधनांच्या कॉम्बो पॅकवर ‘Buy More, Save More’ ऑफर लागू आहे.

थोडक्यात, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डीमार्टची ही विशेष डिस्काउंट ऑफर ग्राहकांना आकर्षित करणार आहे. सर्वसामान्यांना या डिस्काउंट ऑफरमुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News