घरामध्ये साठवलेल्या हरभऱ्याला कीड आणि भुंगा लागतो का? ‘हे’ सोपे उपाय करा, कधीच नाही लागणार हरभऱ्याला कीड

Ahmednagarlive24 office
Published:

शेतकरी कुटुंब असो किंवा नोकरदार वर्ग असो अशा प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे धान्य आणि कडधान्य वर्षभर पुरेल इतके विकत घेऊन साठवून ठेवलेले असते. यामध्ये ज्वारी किंवा बाजरी तसेच गहू यांचा समावेश होतोच परंतु कडधान्यांमध्ये हरभरा, तूर यासारख्या आवश्यक असलेल्या पदार्थांचा देखील समावेश होतो.

कारण या लोकांच्या आहारामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असल्याने वर्षभर पुरेल इतका साठा बरेचजण करून ठेवतात. परंतु नेमके आपण जेव्हा असे पदार्थ साठवून ठेवतो तेव्हा त्यांना कीड किंवा भुंगा लागण्याचे समस्या निर्माण होते व त्यामुळे बऱ्याच धान्याचे नुकसान होते.

हीच बाब हरभऱ्याच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. बऱ्याचदा आपण घरामध्ये हरभरा विकत आणून साठवून ठेवतो व त्याला काही कालावधीने भुंगा आणि कीड लागते व तो खराब होतो. त्यामुळे जर घरामध्ये हरभरा अगदी स्वच्छ व चांगला ठेवायचा असेल व त्याला कुठल्याही प्रकारची कीड व भुंगा लागू नये असे वाटत असेल तर काही सोपे उपाय करून पाहणे खूप गरजेचे आहे.

हे उपाय करा आणि हरभऱ्याला भुंगा लागण्यापासून वाचवा

1- लाल मिरचीचा वापर- समजा तुम्ही घरामध्ये जर एखाद्या बरणीमध्ये हरभरे भरून ठेवले असतील तर त्या बरणीमध्ये वाळलेल्या चार ते पाच लाल मिरच्या टाकून ठेवाव्यात. मिरच्यांना जो काही तिखट वास असतो त्यामुळे हरभऱ्यांना कीड लागत नाही व ते जास्त दिवस स्वच्छ व ताजे राहतात.

2- तेजपानाचा वापर- तेजपान हे मसाल्यामध्ये किंवा स्वयंपाकाची चव वाढण्यासाठी वापरले जाते. परंतु हरभरा व इतर कोणत्याही कडधान्याला जर कीड किंवा भुंगा लागू नये असे वाटत असेल तर त्याकरिता तेजपानाचा वापर खूप फायद्याचा ठरतो. यासाठी तुम्ही ज्या बरणीत हरभरा ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन तेजपान भरून ठेवावीत.

3- काचेची बरणी- घरामध्ये प्रामुख्याने स्टीलचे डबे किंवा प्लास्टिकचे कंटेनर हरभरे भरण्यासाठी वापरले जातात. परंतु त्याऐवजी जर काचेच्या एअर टाईट बरण्या वापरल्या तर फायदा होतो. कारण यामुळे वातावरणातील बाहेरच्या आद्रता किंवा ओलावा आतमध्ये जात नाही व हरभरे अधिक दिवस चांगले राहतात.

4- पावडर लावून ठेवणे- तांदूळ भरताना आपण तांदळाची पावडर लावतो तीच पावडर जर हरभऱ्यासाठी लावली तरी फायदा होतो. तर अशाप्रकारे पावडर लावलेल्या हरभरे भिजत घालण्यापूर्वी ते तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेणे गरजेचे आहे. जेव्हा पावडर चा हरभऱ्यावरील अंश पूर्णपणे निघून जाईल तेव्हाच हरभरे भिजत घालावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe