18 नाही आता 16व्या वर्षीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स ! कुठे करावा लागणार अर्ज ?

मोटार वाहन कायदा 1988 नुसार 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. मात्र याच कायद्यात अशी एक तरतूद आहे ज्यामुळे सोळाव्या वर्षी देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. पण हे ड्रायव्हिंग लायसन्स फक्त आणि फक्त गिअरलेस स्कूटर चालवण्यासाठीच उपयोगी पडते. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आता अठरा नाही तर 16 व्या वर्षी देखील मिळू शकते.

Tejas B Shelar
Published:
Driving License News

Driving License News : भारतात मोटार वाहन कायदा 1988 नुसार रस्त्यांवर वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते. ड्रायव्हिंग लायसन्स हे वाहनाच्या प्रकारानुसार भिन्न भिन्न असते.

टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर तसेच मालवाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी दिले जाणारे ड्रायव्हिंग लायसन्स हे भिन्न असते. विना वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवल्यास मोटार वाहन कायद्यानुसार सदर वाहन चालकावर कारवाई होत असते.

यामुळे सर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही आधी हे लायसन्स काढून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. खरंतर ड्रायव्हिंग लायसन्स वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळते.

मोटार वाहन कायदा 1988 नुसार 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. मात्र याच कायद्यात अशी एक तरतूद आहे ज्यामुळे सोळाव्या वर्षी देखील ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते.

पण हे ड्रायव्हिंग लायसन्स फक्त आणि फक्त गिअरलेस स्कूटर चालवण्यासाठीच उपयोगी पडते. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आता अठरा नाही तर 16 व्या वर्षी देखील मिळू शकते.

परंतु हे लायसन्स फक्त गिअरलेस स्कूटर चालवण्यासाठी दिले जाते. मोटार वाहन कायदा १९८८ च्या चॅप्टर २ मधील मोटार वाहनचालकांच्या परवान्याच्या चौथ्या मुद्द्यात ही माहिती देण्यात आली आहे.

यानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण, परवाना मिळाल्यानंतर १६ वर्ष वयाच्या व्यक्तीला ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे वाहन चालवता येते.

पण, तो इतर कोणतेही वाहन त्या वयात चालवू शकत नाही, त्यासाठी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सामान्य ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासारखीच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe