Driving Training Subsidy : तुम्ही चार चाकी वाहन शिकणार आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शासनाकडून आता चार चाकी वाहन शिकणाऱ्यांना सुद्धा अनुदान दिले जाणार आहे.
ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाद्वारे राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्याला पाच हजार रुपयांची अनुदान देण्याची तरतूद आहे.

मात्र या योजनेचा लाभ सरसकट मिळत नाही तर काही विशिष्ट लोकांना त्याचा लाभ मिळतो. अशा स्थितीत आज आपण या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेऊन ड्रायव्हिंग शिकण्याचा लाभ कोणाला मिळतो , यासाठी अर्ज कसा करायचा ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला लाभ मिळतो?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांसाठी ही योजना सुरू केली आहे. अर्थात कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ड्रायव्हिंग शिकण्यासाठी शासनाकडून मदत केली जाते.
या संबंधित पात्र लोकांना चारचाकी चालवण्याचे (LMV) प्रशिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. पण यासाठी शासनमान्य ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. प्रशिक्षण पूर्ण करून कायमस्वरूपी परवाना मिळवल्यानंतर मग योजनेतून दिली जाणारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते.
या योजनेची विशेषता अशी की यातून एका कुटुंबातील तीन सदस्य लाभ घेऊ शकतात. नोंदणीकृत कामगार तसेच त्याच्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोन सदस्य या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
मात्र योजनेच्या लाभासाठी अर्जदार 18 वर्षांवरील असावा. महत्वाची बाब म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करून आणि परवाना मिळाल्याच्या एका वर्षाच्या आत योजनेसाठी अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. उशिरा अर्ज करणाऱ्यांचे अर्ज बाद होणार आहेत.
अर्ज कुठ करावा?
इच्छुक आणि पात्र नागरिकांना योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. www.public.mlwb.in ह्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.
मात्र अर्ज करताना एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे अर्जदाराला आपल्या निवासस्थानाजवळचे किंवा कामाच्या ठिकाणाजवळचे ‘कामगार कल्याण केंद्र’ सिलेक्ट करावे लागणार आहे.