100 रुपयांचा प्रवास फक्त 30 रुपयात ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार ई-बाईक टॅक्सी, सरकारकडून अनुदानही मिळणार

काल एक एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने राज्यात ई-बाईक टॅक्सी चालवण्यास परवानगी दिली आहे. किमान एक लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये ही टॅक्सी सेवा सुरू होणार असून यामुळे शंभर रुपयांचा प्रवास फक्त तीस ते चाळीस रुपयांमध्ये होणे शक्य होणार आहे.

Published on -

E-Bike Taxi Service In Maharashtra : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या महानगरांमध्ये टॅक्सीने प्रवास करणे फारच महाग झाले आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने महानगरांमधील टॅक्सीचा प्रवास देखील महाग झाला आहे. मात्र, आता लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू होणार आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांचा टॅक्सीचा प्रवास अधिक किफायतशीर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फडणवीस सरकारने राज्यात ई-बाईक टॅक्सी चालवण्यास मंजुरी दिली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

याच प्रस्तावाला या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून आता लवकरच राज्यात ई बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे.

मंत्रिमहोदयांनी सांगितल्याप्रमाणे किमान एक लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार असून या निमित्ताने नागरिकांना दळणवळणाचे एक नव साधन उपलब्ध होणार आहे आणि यामुळे त्यांना स्वस्तात प्रवास करता येणे शक्य होणार आहे. आत्तापर्यंत एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती.

रिक्षा किंवा टॅक्सीतून जाण्यासाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडे द्यावे लागत होते. पंरतु आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार असा दावा सरकारकडून केला जातोय. आता आपण शासनाने परवानगी दिलेल्या या ई बाईक टॅक्सी उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कसा आहे शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम

महाराष्ट्र राज्य शासनाने ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली असून संपूर्ण महाराष्ट्रात ही सेवा सुरू केली जाणार आहे. येत्या एक ते दोन महिन्यात ही सेवा सुरू होणार असा अंदाज आहे. ज्या शहराची लोकसंख्या एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा सर्वच शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार असल्याचे सरकारकडून सांगितले गेले आहे.

तसेच ई-बाईक टॅक्सीने प्रवासासाठी 15 किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. याशिवाय 50 बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेलाच या वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे. बाईकवर दोन प्रवाशांमध्ये पार्टिशन असेलल्या आणि पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी पूर्ण कव्हर असेलल्या ई-बाईकलाच परवानगी देण्यात येणार आहे.

अजून या ई बाईक टॅक्सी सेवेचे भाडे निश्चित झालेले नाही मात्र सध्या रिक्षाने प्रवास करण्यासाठी जर प्रवाशांना शंभर रुपयांचा खर्च करावा लागत असेल तर ई बाइक टॅक्सीने प्रवास करण्यासाठी फक्त 30 ते 40 रुपये भाडे लागणार आहे. तसेच रिक्षा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या चालकांना यासाठी अनुदान सुद्धा दिले जाणार आहे.

रिक्षावाल्याच्या मुलाने किंवा मुलीने जर ई बाईक टॅक्सी घेतली तर त्याला दहा हजार रुपयाचे अनुदान मिळणार असे सरकारचे धोरण असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत शासनाच्या या धोरणामुळे सर्वसामान्यांना कमी पैशात प्रवास करता येणार आहे शिवाय यामुळे रोजगार निर्मिती सुद्धा शक्य होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe