Ration Card:- सरकारच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार किंवा घोळ केला जातो त्याला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे धोरण अवलंबले असून त्या पद्धतीने उपाय योजना देखील करण्यात येत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण स्वस्त धान्य दुकानाचा विषय बघितला तर यामध्ये देखील बऱ्याचदा स्वस्त धान्य दुकानातील आलेले धान्य हे काळ्या बाजारात विकले जाते किंवा शिधापत्रिकाधारकांना कमी धान्य दिले जाते अशा प्रकारे अनेकदा तक्रारी प्राप्त होतात.

या सगळ्या पद्धतीला आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे व यानुसार आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे.
शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी केली नाही तर मिळणार नाही धान्य
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रत्येक शिधापत्रिका धारकांना आता ई केवायसी बंधनकारक करण्यात आली असून रेशन कार्ड वर कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे आहेत या सगळ्या सदस्यांनी ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे व ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर संबंधित रेशन कार्डधारकांना धान्य वितरणाचा म्हणजेच मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात पाहिले तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देखील देण्यात आले असून ही केवायसी पडताळणीची मोहीम ताबडतोब पूर्ण करण्याची व त्यासंबंधीचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तसे पाहायला गेले तर एप्रिल 2024 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रिय कार्यालयांना शिधापत्रिकेतील लाभार्थींची ई केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते व मे महिन्याच्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडले.
ई –केवायसी प्रक्रिया कशी करावी?
ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी रेशन कार्ड वरील नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडीग करून घेणे गरजेचे आहे व काही सेकंदाची ही प्रक्रिया असून इ केवायसी पूर्ण झाल्यानंतरच येत्या कालावधीत लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ मिळू शकणार आहे.
तसेच जे कुटुंबे स्थलांतरित झालेले असतील व ज्या ठिकाणी ते वास्तव्य करत असतील त्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन इ केवायसी ची पडताळणी पूर्ण करता येणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क असून स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीनच्या माध्यमातून प्रत्येक रेशन कार्डधारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
eआधार कार्ड नंबर टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाभार्थ्याची रेशन देखील बंद होण्याची शक्यता आहे.
15 जून पूर्वी करावी पडताळणी
या महिन्याचे रेशनचे वाटप 15 जून पासून सुरु होणार असून त्यापूर्वी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानातून इ केवायसी पडताळणी करून घेणे गरजेचे आहे.