राज्य सरकारने सुरू केली नवीन शैक्षणिक कर्ज योजना ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 40 लाखांचे कर्ज

Published on -

Educational Loan Scheme : महाराष्ट्र राज्य शासन समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवते. शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील एक कौतुकास्पद योजना सुरू केली आहे.

पैशांच्या अभावामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाही. दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची हीचं अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने नवीन शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली.

यातून देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना कमाल 30 लाख रुपये मिळतात. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 40 लाखांचे कर्ज दिले जाते. अशा स्थितीत आज आपण या योजनेची सर्व माहिती जाणून घेऊयात.

अनुसूचित जाती प्रवर्गाला मिळतो लाभ 

या योजनेचा लाभ एससी कॅटेगिरी मधील चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना मिळतो. आता चर्मकार समाजात जेवढ्या उपजाती येतात त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. ही शैक्षणिक कर्ज योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या माध्यमातून राबवली जात आहे.

या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी हा केंद्रातील अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळकडून उपलब्ध होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. यांतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज हे सहा ते सात टक्के व्याजदरात मिळते.

या योजनेतून मुलींना 0.50% कमी व्याजदरात लोन मिळते. या योजनेतून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतल्यास विद्यार्थ्यांना 10 ते 12 वर्ष परतफेडीसाठी उपलब्ध होतात. तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जाचा लाभ दिला जातो.

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करता येतो. शैक्षणिक कर्जासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे अर्ज करता येतो. यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe