कामाची बातमी ! आता महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार, वर्गातच होणार प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी

राज्यातील महाविद्यालयांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत सोबतच प्राध्यापकांची हजेरी सुद्धा बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान आता याच संदर्भातील नवीन अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत.

Published on -

Educational News : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत तर दुसरीकडे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असल्याने पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत.

खरे तर महाराष्ट्रात आणि देशात आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लवकरच नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. दरम्यान पदवी व पदवीधर अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आणि नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आवड-निवडी यांना प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या संलग्नित 108 उच्च महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठाच्या संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांवर प्राचार्यांचे लक्ष राहणार आहे. सोबतच आता महाविद्यालयातील प्राध्यापकांची हजेरी क्लासरूममध्येच बायोमेट्रिकद्वारे नोंदविण्यात येणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कशी असणार प्रक्रिया ? 

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर विद्यापीठातील या उपक्रमाची सुरुवात विद्यापीठ संकुलात होणार आहे. पण ही अंमलबजावणी सूरु करण्याआधी कुलगुरू एक अभ्यास समिती स्थापन करून त्यांचा अहवाल सादर करणार आहेत. दरम्यान या अहवालाच्या आधारावरच पुढील अंमलबजावणी केली जाणार असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

खरेतर, विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, सर्व विषयांचे तास नियमित घेतले जातात का? किती विद्यार्थी उपस्थित राहतात? यावर या उपक्रमामुळे नियंत्रण ठेवता येणार अशी माहिती देण्यात आली आहे.

बायोमेट्रिक हजेरी कधी घेतली जाणार?

या निर्णयानुसार प्राध्यापकांना आता पहिल्या व शेवटच्या तासाला बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार असे सांगितले गेले आहे. दरम्यान हा बदल 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये लागू होणार अशी माहिती देण्यात आली आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्राबाबत बोलायच झाल्यास याची सुरुवात येत्या 8 दिवसांनी म्हणजे 12 जून 2025 पासून होणार आहे. सध्या सत्र परीक्षांचे निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 1.82 लाख उत्तरपत्रिकांपैकी 90 हजारांहून अधिक तपासून पूर्ण झाल्या आहेत आणि अंतिम निकाल सुद्धा लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News