पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील आदेश निघेपर्यंत शाळा बंद राहणार, शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय

Published on -

Educational News : पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने तसेच शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पहिली ते पाचवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे आता पुढील आदेश निघेपर्यंत पहिले ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा बंद राहणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत दिल्ली राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच दिल्ली शिक्षण विभागाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत पाठवायचे की ऑनलाईन वर्गांना हजेरी लावायची याचा पर्याय निवडण्याची मुभा दिली होती.

पालक त्यांच्या इच्छेप्रमाणे एकतर विद्यार्थ्यांना थेट शाळेत पाठवत होते किंवा ऑनलाईन वर्गांना हजेरी लावण्यास सांगत होते. पण, आता विद्यार्थ्यांना फक्त एकच पर्याय उपलब्ध आहे आणि तो पर्याय म्हणजे ऑनलाईन वर्गांना हजेरी लावण्याचा.

आलेल्या माहितीनुसार पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग आता पुढील आदेश निघेपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन वर्गांना हजेरी लावता येणार आहे.

या विद्यार्थ्यांना आता यापुढे ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. दिल्ली राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग पुढील आदेश निघेपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की दिल्लीतील वायू प्रदूषण हा नेहमीच चिंतेचा विषय राहतो. हिवाळा सुरू झाला की दिल्लीतील वायू प्रदूषण जास्त खराब होते. प्रदूषणामुळे दिल्लीतील सध्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजेचं AQI हा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.

ह्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त खासगी शाळांमधील नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील आदेशापर्यंत या छोट्या छोट्या बालकांच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. सर्व शाळा प्रमुखांना या संबंधित नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाइन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News