सध्या इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील वाढते पेट्रोलचे दर. जर तुम्हीही नवीन स्कुटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी काही चुका टाळा.
Electric scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करायला जात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण सध्या इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्राहक सध्या कोणतीही खातरजमा न करता इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत आहेत.
जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत असताना ती कितपत फायद्याची आणि तोट्याची आहे नक्की पहा. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही अडचणीत याल.
मायलेजचा विचार करा
समजा तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत असाल तर त्याचा फायदा काय आहे? याचा विचार करावा. जर तुम्ही जास्त लांबचा प्रवास करण्याच्या विचारात असाल तर स्कूटर तुमच्यासाठी नाही. डिलिव्हरी एजंट म्हणून स्कुटरचा वापर करणार असाल, तर ते काही प्रमाणात फायदेशीर ठरेल, कारण ईव्ही स्कूटरची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्याची बॅटरी निर्धारित किलोमीटरच्या अगोदरच संपते. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीवरून स्कूटरची बॅटरी किती किलोमीटर चालेल याचा अंदाज तुम्हाला लावता येणार नाही.
खासियत
फुजियामा स्पेक्ट्रा ही 250-वॅटची BLDC मोटर असणारी एक इलेक्ट्रिक स्कूटर असून ग्राहकांना जी सुरळीत आणि कार्यक्षम राइड प्रदान करते. ही 1.25 KWH डिटेचेबल लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे आणि जी प्रति चार्ज 60 किमीची श्रेणी देते. तसेच ही स्कुटर पूर्णपणे रिचार्ज होण्यास एकूण 4-5 तासांचा वेळ घेते.
कंपनीची स्कूटर तुम्हाला 5 वेगवेगळ्या रंगांमध्ये खरेदी करता येईल, वैयक्तिक अभिरुचीनुसार जी अनेक पर्याय ऑफर करत आहे. यूएसबी पोर्ट प्रवासात मोबाइल चार्जिंगला परवानगी देते, तसेच रंगीत डिजिटल मीटर स्कूटरला शैलीचा स्पर्श देते. ही एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर असून जी चांगली श्रेणी आणि काही उपयुक्त फीचर्स देते, त्यामुळे परवडणाऱ्या आणि कार्यक्षम वाहतुकीचा मार्ग शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.