EPFO कडून नोकरदारांना आणखी एक मोठी भेट; PF ची रक्कम वाढणार, सरकार आता…..

या अर्थसंकल्पात पगारदार लोकांचे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय झाला. दरम्यान आता टॅक्स मध्ये सर्वसामान्य नोकरदारांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांना आणखी एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.

Published on -

EPFO Money Alert : केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी मोठा दिलासा दिल्यानंतर आता आणखी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रातील सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पगारदार लोकांचे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय झाला.

दरम्यान आता टॅक्स मध्ये सर्वसामान्य नोकरदारांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांना आणखी एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) 28 फेब्रुवारी रोजी आपल्या केंद्रीय न्यासी मंडळाच्या (CBT) बैठकीत भविष्य निधी (PF) ठेवींवरील व्याजदरात बदल करण्याचा विचार करत आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर 8% पेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून तो मागील वर्षीच्या 8.25% च्या जवळपास कायम ठेवला जाऊ शकतो.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दरवर्षी, EPFO व्याजदराचा प्रस्ताव सादर करते, त्यानंतर CBT त्यास अधिकृतरित्या मंजुरी देत असते. सीबीटीकडून अधिकृत रित्या मंजुरी मिळाल्यानंतर अर्थ मंत्रालयाकडून त्याला अंतिम मान्यता दिली जाते आणि ही अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच ही रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.

EPFO चा निर्णय करोडो पगारदारांसाठी फायद्याचा

सध्या, EPFO कडे 6.5 कोटींहून अधिक ग्राहक नोंदणीकृत आहेत. यामुळे पीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर या कोट्यावधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान जर तुम्हीही ईपीएफओ चे सदस्य असाल तर पीएफ खात्याचा शिल्लक तपासण्यासाठी तुम्ही उमंग अ‍ॅप वापरू शकतात.

तसेच, UAN क्रमांक नोंदणीकृत असल्यास, 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा 7738299899 वर एसएमएस पाठवून आपल्या खात्याची माहिती मिळवता येईल. मात्र, खात्याशी आधार, पॅन आणि बँक तपशील लिंक असणे आवश्यक आहे.

करदात्यांसाठी सरकारची मोठी सवलत

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा दिला. नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर संपूर्ण करमाफी देण्याची घोषणा करण्यात आली.

याशिवाय, वेतनदारांसाठी 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन लागू करण्यात आली असून, त्यामुळे आता 12.75 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. याशिवाय, करस्लॅबमध्येही मोठे बदल करण्यात आले असून, 25 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1.1 लाख रुपयांची कर बचत होणार आहे.

नोकरदारांना दुहेरी भेट !

सरकारच्या या निर्णयांमुळे देशभरातील नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे, कर कपातीमुळे उत्पन्नावर अधिक बचत होणार असून, दुसरीकडे, EPFO च्या संभाव्य निर्णयामुळे पीएफवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नोकरदार वर्गाचे पाचही बोट तुपात राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe