खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PF खातेधारकांसाठी सरकारने सुरू केली नवीन सुविधा

Published on -

EPFO News : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संघटित क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. तुमचे पण पीएफ अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. सरकारने ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (EPF) संबंधी सेवा अधिक सोप्या आणि जलद पद्धतीने मिळाव्यात यासाठी ईपीएफओने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आता सदस्यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण EPF सेवांचा ॲक्सेस एकाचं लॉगिनवर मिळणार आहे. यामुळे डिजिटल प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.

यासाठी पासबुक लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन ‘Passbook Lite’ या सुविधेमुळे सदस्यांना त्यांच्या खात्याचा संक्षिप्त आढावा एकाचं क्लिकवर मिळवता येणार अशी माहिती सरकारने दिली आहे.

यात खात्यात किती योगदान जमा झाले, किती रक्कम काढली आणि सध्या किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे. पूर्वी अशी माहिती घ्यायची असल्यास कर्मचाऱ्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागत.

वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन ही माहिती घ्यावी लागत होती. पण आता कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना स्वतंत्र पोर्टलवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही अशी माहिती EPFO ने दिली आहे.

ही सर्व सुविधा unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवरून कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या पोर्टलवर सदस्य थेट लॉगिन करून त्यांचा Passbook Lite आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी ATM-UPI च्या मदतीने पीएफचे पैसे काढता येणार आहेत.

सदस्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. EPFO सदस्यांना एटीएम आणि युपीआय ॲपच्या मदतीने थेट पीएफची रक्कम काढण्याची सुविधा मिळेल. यासाठी विशेष ATM कार्ड देण्यात येईल, जे PF खात्याशी लिंक असेल.

तसेच GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI ॲप्सच्या माध्यमातूनही पैसे काढणे शक्य होणार आहे. या सुविधेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांचा निधी वापरणे आणि माहिती मिळवणे अधिक सोपे व पारदर्शक होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News