प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF च्या नव्या व्याजदराला मंजुरी, आता PF खात्यात 5 लाख जमा असल्यास किती व्याज मिळणार ?

तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करता का आणि तुमचे पीएफ अकाउंट पण आहे का? मग, आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की, पीएफ खातेधारकांसाठी वित्त विभागाकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

EPFO News : प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी एक गुण न्यूज समोर येत आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून म्हणजेच एपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायी निर्णय घेण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 साठी epfo कडून पीएफ खात्यातील जमा रकमेसाठी 8.25 % व्याजदराची शिफारस करण्यात आली होती आणि केंद्रातील मोदी सरकारकडून या प्रस्तावाला अखेर कार मान्यता देण्यात आली आहे.

खरे तर गेल्या आर्थिक वर्षात अर्थातच आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पीएफ खात्यातील जमा रकमेचा सुद्धा 8.25% एवढाच होता. यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये काय होणार? हे व्याजदर कमी होणार की वाढणार की कायम राहणार असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात होते.

मात्र आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पीएफ खात्याच्या व्याजदरात कोणताच बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच व्याजदर कमी देखील झाले नाहीत आणि वाढलेही नाहीत.

नक्कीच व्याजदरात कपात झाली असती तर कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला असता मात्र आता व्याजदर कायम आहेत आणि यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

ईपीएफओकडून व्याजदर 8.25% इतके निश्चित करण्यात आले आणि या संदर्भातील प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. दरम्यान आता वित्त मंत्रालयाकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

यामुळे देशभरातील सात कोटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या नव्या व्याजदरानुसार जर एखाद्या व्यक्तीचे पीएफ खात्यात पाच लाख रुपये जमा असतील तर त्यांना किती व्याज मिळणार याबाबतचे कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.

5 लाख जमा असतील तर किती व्याज मिळणार? 

8.25 टक्क्यांच्या हिशोबानं जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात एक एप्रिल 2024 रोजी पाच लाख रुपये जमा असतील तर त्या व्यक्तीला एका वर्षात 41,250 इतके व्याज मिळणार आहे.

जर समजा पीएफ खात्यामध्ये तीन लाख रुपये जमा असतील तर 8.25 टक्के दराने 24 हजार 750 रुपये इतके व्याज मिळणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात एक लाख रुपये जमा असतील तर त्याला 8.25 टक्के दराने 8,250 इतके व्याज मिळणार आहे.

पीएफ खात्यात किती रक्कम जमा होते?

ईपीएफओच्या कायद्यानुसार, पीएफ खात्यात कर्मचाऱ्यांकडून आणि कंपनीकडून एक ठराविक रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम थेट पीएफ खात्यात जमा होते.

त्याशिवाय कंपनीकडून देखील ईपीएफओला 12 टक्के रक्कम दिली जाते, यापैकी 3.67% रक्कम पीएफ खात्यात जाते आणि 8.33% रक्कम ईपीएस पेन्शन साठी जाते.

म्हणजेच कर्मचारी पीएफ साठी जेवढे योगदान देतात तेवढेच योगदान कंपनीकडूनही मिळते. मात्र कंपनीकडून मिळणारे योगदान दोन भागात विभागले जाते यातील काही भाग पीएफ मध्ये जातो आणि काही भाग पेन्शनसाठी जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News