विमान कोसळलं तरी ‘ही’ सीट वाचवू शकते तुमचा जीव; जाणून घ्या विमानातील सर्वात सुरक्षित आणि धोकादायक सीटची जागा!

Updated on -

विमान प्रवास म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर हवेत उडण्याचा थरार, उंचावरून खाली दिसणारा नजारा, आणि फक्त काही तासांत दूरवर पोहोचण्याची सोय असं चित्र उभं राहतं. विमानातून प्रवास करणं जितकं आकर्षक आणि आरामदायक वाटतं, तितकाच तो एक थोडासा जोखमीचाही भाग असतो. कारण एखादा अपघात झाला, तर त्यातून बाहेर पडणं सहज शक्य नसतं. म्हणूनच एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे विमानात सर्वात सुरक्षित जागा कोणती असते?

कोणती सीट सर्वात सुरक्षित?

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक अभ्यास झाल्यानंतर हे समोर आलं आहे की, विमानाच्या मागच्या भागात असलेल्या सीट्समध्ये बसलेल्यांना अपघात घडल्यानंतर वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते. काही आकडेवारीनुसार, विमानाच्या मागच्या भागात बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू दर केवळ 28 टक्के इतका असतो. म्हणजे उर्वरित जागांच्या तुलनेत नक्कीच कमी.

या मागच्या सीट्स सुरक्षित का असतात, यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे. बहुतांश विमान अपघातांमध्ये समोरचा भाग म्हणजेच कॉकपिटच्या जवळचा भाग सर्वात आधी आणि मोठ्या ताकदीने धडकतो. त्यामुळे मागचा भाग तुलनेत जरा सुरक्षित असतो आणि त्यात बसलेले प्रवासी वाचू शकतात. याशिवाय, अपघातानंतर क्रू मेंबर्स जे मागच्या भागातच बसलेले असतात, त्यांनाही वाचल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

पण तरीही, अनेक प्रवासी मागच्या सीट्सना टाळतात. कारण त्या भागात वॉशरूम्स असतात, जागा कमी असते आणि काहींना टेकऑफ किंवा लँडिंगवेळी होणारा आवाजही जरा जास्त त्रासदायक वाटतो. तसंच, इमर्जन्सी एक्झिट जवळ असल्यामुळे काहींना थोडं असुरक्षितही वाटतं.

धोकादायक जागा कोणती?

दुसरीकडे, विमानाच्या मधोमध जिथे पंखे असतात त्या भागातील जागा मात्र तुलनेत अधिक धोकादायक मानली जाते. कारण त्या पंख्यांमध्ये इंधन असतं आणि अपघाताच्या वेळी इथे आग लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे मध्यभागी असलेल्या सीट्स सर्वात असुरक्षित मानल्या जातात.अर्थात, कोणतीही सीट पूर्णतः सुरक्षित किंवा असुरक्षित नाही. अपघाताचा प्रकार, परिस्थिती आणि वेळ यावर बरेच काही अवलंबून असतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News