विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! जून महिन्यात UGC NET, नीट पीजी सह ‘या’ 12 परीक्षा घेतल्या जाणार ! कोणती एक्झाम कोणत्या तारखेला ?

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर जून महिन्यात विविध परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून आज आपण जून महिन्यात कोणकोणत्या एक्झाम घेतल्या जातील याचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Exam In June : विद्यार्थ्यांसाठी जून महिना विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जून महिना विशेष आणि फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खरंतर 16 जून 2025 पासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे या दिवशी राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे.

यासोबतच या जून जून महिन्यात अनेक सरकारी नोकरीच्या परीक्षा होणार आहेत तसेच काही प्रवेश परीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहेत. या विविध परीक्षांच्या तारखा सुद्धा निश्चित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चालू महिन्यात यूजीसी नेट, एनईईटी पीजी, आरआरबी एनटीपीसी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.

यामुळे सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना फारच महत्त्वाचा आहे. दरम्यान आज आपण जून महिन्यात कोणकोणत्या परीक्षा होणार याचा आढावा या ठिकाणी देणार आहोत.

यूजीसी नेट 

जून महिन्याच्या शेवटी नॅशनल टेस्टिंग एजन्सी यूजीसी नेट ची एक्झाम होणार आहे. 21 ते 30 जून या कालावधीत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यात पेपर 1 आणि पेपर 2 चा समावेश असेल.

यातील प्रत्येक पेपर हा 180 मिनिटे म्हणजे 3 तासाचा राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही पेपरांसाठी कोणताच ब्रेक राहणार नाही. या परीक्षांच्या तारखांचा तीन ते चार दिवस आधीच याचे हॉल तिकीट जारी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

आरआरबी एनटीपीसी परीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, आरआरबी एनटीपीसी सीबीटी -1 परीक्षा 5 जूनपासून सुरु होनार आहे. या परीक्षा जवळपास 23 जून पर्यंत सुरु राहतील. दरम्यान या परीक्षांचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून जवळपास आठ हजार पदे भरली जाणार आहेत. दरम्यान या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार सीबीटी -2 साठी पात्र असतील. 5 जून रोजी, एएआय नॉन-एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षा देखील सुरू होईल, जी दोन दिवस चालणार आहे.

Neet PG Exam 

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, एनबीईने नीट पीजी परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 15 जून रोजी घेण्यात येईल. पण, सुप्रीम कोर्टाशी संबंधित आदेशानुसार त्यात बरेच बदल होतील.

दरम्यान या परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच जारी केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही याच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष लक्ष ठेवायला हवे.

जून महिन्यात होणाऱ्या इतर एक्झाम

एमपीपीजीसीएल एई – 4 जून 2025

पंजाब पोलिस कॉन्स्टेबल – 4 ते 18 जून

एएआय नॉन एक्झिक्युटिव्ह- 5 ते 6 जून

आयडीबीआय कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक परीक्षा – 8 जून

यूपीएससी आयईएस प्राथमिक परीक्षा – 8 जून

यूपीएससी पीजीटी परीक्षा- 18 जून आणि 19 जून

यूपीएससी कंबाईन जिओ-सिग्निस्ट (मुख्य)- 21 आणि 22 जून

बिटसॅट 2025- 22 जून ते 26 जून

यूबीआय सहाय्यक व्यवस्थापक- 22 जून

डीएएसएसबी टीजीटी स्पेशल एज्यूकेटर एक्साम – 26, 27 आणि 29 जून

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe