Expressway Toll : देशभरातील वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये देशातील रोड कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत बनवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे.
यामुळे देशातील रस्त्यांचे नेटवर्क हजारो किलोमीटर लांबीने वाढले आहे. विशेषता 2014 पासून देशातील रस्ते विकासाच्या क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

गेल्या दीड-दोन शतकात महाराष्ट्रात आणि देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन महामार्गांची कामे झाली आहेत की आता सगळीकडेचं गुळगुळीत रस्त्यांचा अनुभव घेता येतोय.
मात्र, नव्या महामार्गांची निर्मिती झाली की त्यावर टोल नाकाही बसवला जातो. महामार्गाचा खर्च वसूल करण्यासाठी शासन टोल टॅक्सचे माध्यम वापरते.
दरम्यान, आज आपण टोल टॅक्स संदर्भातील काही नियमांची माहिती पाहणार आहोत. खरे तर, शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता टोल प्लाजा पासून काही अंतरावर स्थायिक असणाऱ्या रहिवाशांना टोल टॅक्स भरावा लागत नाही.
किती अंतरावरील रहिवाशांना टॅक्स भरावा लागत नाही ?
भारतात दुचाकी वगळता जवळपास सर्वच वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जातो. आजच्या घडीला देशात एक हजाराहून अधिक टोल प्लाजा असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इंधनाच्या खर्चाएवढाच खर्च टोलसाठी सुद्धा करावा लागतो.
अलीकडे सरकारने टोल संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. जसे की केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामार्गांवर प्रवास करण्यासाठी आता एक विशेष पास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हा तीन हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरतोय.
याशिवाय गेल्यावर्षी सरकारने टोल संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय म्हणजे आता टोल प्लाजा पासून 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागत नाही.
थोडक्यात जर तुमचे घर टोल प्लाजा पासून जवळच असेल तर तुम्हाला टोल टॅक्स पासून मुक्ती मिळणार आहे. ज्या लोकांचे घर टोल प्लाजा पासून 20 किलोमीटर अंतराच्या परिसरात आहे अशा लोकांना टोल टॅक्स मधून सवलत देण्यात आली आहे.
पण यासाठी रहिवासी पुरावा द्यावा लागतो. विशेष म्हणजे हे धोरण सप्टेंबर 2024 पासून लागू आहे अर्थातच या धोरणाला आता एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. जितनी दूर उतना टोल असे हे धोरण आहे.
गेल्या वर्षी सुरु झालेल्या या नव्या धोरणाअंतर्गत एक खास प्रणाली ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. या खास प्रणालीला जीएनएसएस प्रणाली असे संबोधले जाते आणि या प्रणाली द्वारे ट्रॅक करण्यात आलेल्या वाहनांना वीस किलोमीटरच्या परिघात टोल सुट लागू केली जाते.













