विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध शहरांची यादी जाहीर ! ‘हे’ छोटस शहर दिल्ली, मुंबईला मागे टाकत पहिल्या नंबरवर

भारतात विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध शहरे कोणती? याचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. दरम्यान या अहवालानुसार, विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत आघाडीची 20 शहरे कोणती आहेत? याबाबत आता आपण थोडक्यात माहिती पाहूयात.

Published on -

Extra Marital Affairs : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रात सुद्धा गुन्हेगारीचे प्रमाण फारच अधिक आहे आणि यातील बहुतांशी गुन्हेगारीची प्रकरणे ही विवाहबाह्य संबंधातून घडत असल्याचेही वारंवार आपल्याला माध्यमांच्या बातम्यांमधून समजते.

विवाहबाह्य संबंधांमुळे खुनाच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात. न्यायालयात अशी प्रकरणे आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. पूर्वी विवाहबाह्य संबंधांच्या घटना फारच कमी प्रमाणात घडत असत मात्र अलीकडे या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि गुन्हेगारी देखील वाढली आहे.

दरम्यान आता विवाहबाह्य संबंधांच्या संदर्भातील एक नवीन अहवाल समोर आला आहे. या नव्या अहवालात भारतातील कोणत्या शहरांमध्ये सर्वाधिक विवाहबाह्य संबंध घडतं आहेत? याची माहिती देण्यात आली आहे.

ॲशले मॅडिसन या विवाहित लोकांसाठीच्या डेटिंग साईट कडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून या अहवालात विवाहबाह्य संबंधांमध्ये देशातील आघाडीच्या टॉप 20 शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आता आपण या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणत्या शहराचा नंबर लागतो आणि या संपूर्ण यादीत महाराष्ट्रातील किती शहरे समाविष्ट आहेत याची माहिती पाहूयात.

विवाहबाह्य संबंधांमध्ये देशातील आघाडीची शहरे 

ॲशले मॅडिसनने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतातील एक छोटेसे शहर समाविष्ट आहे, यामुळे या शहराची विशेष चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीला मागे टाकून भारतातील तामिळनाडू राज्यातील कांचीपूरम हे शहर या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. म्हणजे दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या महानगरांपेक्षा या छोट्याशा शहरात विवाहबाह्य संबंध अधिक आहेत असे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

खरंतर गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये ॲशले मॅडिसनने जो अहवाल जाहीर केला होता त्यामध्ये तामिळनाडू राज्यातील हे छोटेसे शहर 17 व्या क्रमांकावर होतं मात्र यंदा या शहराने 16 शहरांना मागे टाकले आहे आणि यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या यादीत दिल्लीमधील मध्य दिल्ली, दक्षिण पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली हे सहा जिल्हे समाविष्ट आहेत. या यादीतील मध्य दिल्ली या जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो.

याशिवाय दिल्लीच्या शेजारी असलेले गुरुग्राम, गाझीयाबाद आणि गौतम बुद्ध नगर (नोएडा) या जिल्ह्यांचाही ॲशले मॅडिसनच्या या यादीत समावेश आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील एकाही शहराचा या टॉप 20 शहरांमध्ये समावेश नाहीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!