फाल्गुन महिना शुभ कार्यांसाठी उत्तम असतो, फाल्गुनमध्ये ‘या’ 3 देवतांची पूजा अवश्य करा मिळणार भरपूर आर्थिक लाभ!

Tejas B Shelar
Published:

Falgun Mahina 2025 : देशात सध्या लग्नसराई सुरू आहे आणि लवकरच सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. लवकरच महाशिवरात्री आणि होळीचे सण येणार आहेत. खरेतर, आपल्या हिंदू सणातन धर्मात फाल्गुन महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात महाशिवरात्री आणि होळीसारखे प्रमुख सण साजरे केले जातात.

हा महिना विवाह आणि इतर मंगलकार्यांसाठीही शुभ मानला जातो. पुराणानुसार, याच महिन्यात चंद्राचा जन्म झाला आणि भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह देखील याच महिन्यात झाला होता. या कारणांमुळे, फाल्गुन महिना हा फारच शुभ मानला जातो. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करावे असा सल्ला दिला जातो.

या महिन्यात धार्मिक विधी आणि पूजाअर्चा केल्यास विशेष फलप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिना 13 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होईल आणि 14 मार्च 2025 रोजी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला समाप्त होईल. या काळात काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

योग्य नियमांचे पालन न केल्यास देवतांचा कोप होऊ शकतो, तर काही विशेष देवतांची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. आता आपण फाल्गुन महिन्यात कोणत्या देवतांची पूजा केली पाहिजे? अन कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत शास्त्रात काय सांगितले गेले आहे याची माहिती पाहणार आहोत.

कोणत्या देवताची पूजा करावी?

या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे अत्यंत लाभदायक असते. विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवल्यास आणि शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात. ज्यांना लग्न संबंधित समस्या येत असतील किंवा वैवाहिक जीवन सुधारायचे असेल त्यांनी या महिन्यात भगवान शिव आणि पार्वतीची विशेष पूजा करावी.

भगवान विष्णूची पूजा देखील फाल्गुन महिन्यात अत्यंत शुभ मानली जाते. विष्णू सहस्रनाम पठण करणे, तुळशी अर्पण करणे आणि एकादशीच्या दिवशी उपवास पाळणे यामुळे आर्थिक स्थिती सुधारते, कर्जापासून मुक्तता मिळते आणि जीवनात स्थिरता येते. असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूची भक्ती केल्याने पितृदोष आणि कर्मबाधा दूर होतात.

याशिवाय, चंद्रदेवाची पूजा देखील फाल्गुन महिन्यात महत्त्वपूर्ण मानली जाते. कुंडलीतील चंद्र दोष नष्ट करण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि चंद्र बीज मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरते. यामुळे मनःशांती मिळते, तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण होते.

फाल्गुन महिन्यात धार्मिकता आणि सात्त्विक जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. घर स्वच्छ ठेवणे, दररोज पूजा-अर्चा करणे आणि शक्य असल्यास उपवास ठेवणे हे शुभ मानले जाते. या महिन्यात धान्याचे कमी सेवन करून फळे जास्त खाणे आणि सात्त्विक आहार घेणे श्रेयस्कर ठरते.

काय करू नये?

या महिन्यात काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. मांसाहार, मद्यपान, अंडी आणि तामसिक आहार घेणे निषिद्ध मानले जाते. कोणालाही कठोर किंवा अपशब्द बोलणे टाळावे, कारण या काळात केलेले वाईट कर्म भविष्यात नकारात्मक परिणाम देऊ शकते. तसेच, तीळ आणि गरम पदार्थांचे सेवन टाळणे आणि मनात कोणाच्याही बाबतीत वाईट विचार न आणणे महत्त्वाचे आहे.

फाल्गुन महिना भक्ती, शिस्त आणि आत्मशुद्धीकरणासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. भगवान शिव, भगवान विष्णू आणि चंद्रदेवाची भक्ती केल्यास मनःशांती, समृद्धी आणि जीवनातील सकारात्मक बदल अनुभवता येतात. या महिन्यात धार्मिक नियमांचे पालन करून आणि सात्त्विक जीवनशैली अवलंबून भक्त अधिकाधिक शुभ फळ मिळवू शकतात. त्यामुळे हा संधीसाधू महिना भक्तिभावाने साजरा करावा आणि त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe