Farmer ID News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तसेच उत्पन्नात भरीव वाढ व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.

शासन देशभरातील शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान देते. पी एम किसान योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र आता शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या या नव्या निर्णयानुसार आता फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही.
अशा स्थितीत आज आपण फार्मर आयडी म्हणजे नेमके काय आणि हा आयडी नसल्यास शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ मिळणार नाही याबाबत माहिती पाहणार आहोत.
खरंतर सध्या स्थितीला फार्मर आयडी सहा कृषी योजनांसाठी आवश्यक आहे. म्हणजेच फार्मर आयडी नसेल तर या सहा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही.
फार्मर आयडी म्हणजे काय?
जसे आधार कार्ड असते तसेच शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी आहे. फार्मर आयडी हा एक ओळख क्रमांक आहे मात्र हा फक्त शेतकऱ्यांना मिळतो. आधार कार्ड, बँक खाते, सातबारा उतारा तसेच शेतकऱ्यांच्या मोबाईल सोबत हा फार्मर आयडी कनेक्ट असतो.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या फार्मर आयडीच्या आधारे शेतकऱ्याची जमीन, पीक, पीकपद्धत आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतो.
केंद्र शासनाच्या मते, यामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होत आहे. दरम्यान आता आपण फार्मर आयडी नसल्यास कोणत्या योजनांचा लाभ मिळणार नाही याचा आढावा घेणार आहोत.
शासकीय खरेदी केंद्रावर माल विक्री करतांना : केंद्र शासनाच्या माध्यमातून हमीभावात शेतमालांची खरेदी केली जाते. यासाठी केंद्रातील सरकार संपूर्ण देशभर शासकीय खरेदी केंद्र सुरु करते. मात्र आता याच्या लाभासाठी देखील शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
पी एम किसान योजना : पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजाराचा लाभ मिळतो. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. मात्र आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे.
नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक : शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई दिले जाते. पण आता याचा लाभ मिळवण्यासाठी Farmer ID आवश्यक राहणार आहे.
पीक विमा योजना : प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. पण आता ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पण Farmer ID आवश्यक ठरणार आहे.
महाडीबीटीवरील अनुदान योजना : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध बाबींकरिता अनुदान दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना या महाडीबीटी अंतर्गत येतात. दरम्यान या अंतर्गत बी-बियाणे, खते, कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, पॉवर टिलर, ट्रॅक्टर यांसारख्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास आता फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
कर्ज व व्याज सवलत : शेतकऱ्यांना कर्ज व व्याज सवलतीचा लाभ मिळवायचा असेल तर यासाठी पण फार्मर आयडी लागेल. पीक कर्ज, अल्पमुदतीचे कर्ज, कर्जमाफी किंवा व्याज अनुदान यासाठी Farmer ID अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.













