शेतकऱ्यांना आता नक्कीच अच्छे दिन येणार ! ‘ही’ मोठी मागणी मान्य होणार

Published on -

Farmer Scheme : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी लवकरच मोठा निर्णय होणार आहे. या योजनेबाबत बोलायचं झालं तर यातून लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपये मिळतात.

दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळतो.

आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 21 हप्ते मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांना आता याच्या पुढील हफ्त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान 22 वा हप्ता खात्यात जमा होण्याआधीच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे.

संसदेत लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे सर्व देशवासियांचे बजेटकडे लक्ष आहे. साऱ्या जनतेचे याकडे लक्ष असतानाच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची डेव्हलपमेंट समोर आली आहे. ती म्हणजे यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये

अर्थसंकल्पात सरकार पीएम किसानच्या रकमेत वाढ करणेबाबत मोठी घोषणा करणार असा अंदाज आहे. यामध्ये आणखी चार हजारांची वाढ होईल असा मोठा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय.

म्हणजेच पीएम किसान लाभार्थ्यांना आता 6000 रुपयांऐवजी वार्षिक दहा हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला जातोय. याबाबतची घोषणा अर्थसंकल्पात होईल असा पण दावा होतोय. अद्याप या संदर्भात अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe