फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट ! सरकार ‘या’ लाडक्या शेतकऱ्यांना देणार अतिरिक्त 4 हजार रुपये महिना

मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठवावेतन आयोग स्थापित करण्याची घोषणा केली.

Farmer Scheme

Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होतात. परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच एका आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. अठरावा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.

अशातच आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे सरकार लवकरच या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये मिळत आहेत मात्र केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या योजनेची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत करणार आहे.

म्हणजेच पीएम किसान योजनेच्या रकमेत अतिरिक्त 4 हजार रुपयांची वाढ होणार आहे. याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण मीडिया रिपोर्ट्स मध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे.

मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठवावेतन आयोग स्थापित करण्याची घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सरकारला बसला होता यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापित करण्याचा निर्णय घेतलाय.

म्हणून आता लवकरचं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पीएम किसान योजनेतला निधी वाढवला गेला तर लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची मागणी केली जात होती अन त्यामुळे या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती हाती आलेली नाही म्हणून अर्थसंकल्पात नेमक काय होतं? हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe