मुंबईतल्या व्यवसायाला ठोकला रामराम! गावी परतत सुरू केली आधुनिक पद्धतीने शेती; अवघ्या 3 महिन्यात बनला लखपती, पहा काय केलं असं ‘त्या’ने

Ajay Patil
Updated:
Farmer Success Story Watermelon farming

Farmer Success Story : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षणानंतरही अनेक तरुणांना अपेक्षित अशा नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध होत नाहीत. यामुळे उच्चशिक्षित तरुण देखील अलीकडे शिपाई, हमाल या पदांसाठी अर्ज करत आहेत. दरम्यान अलीकडील काही वर्षात नवयुवक शेतकरी पुत्रांचा ट्रेंड बदलला आहे.

आता या नवयुवक तरुणांना शेती ऐवजी नोकरीच प्यारी आहे. यामुळे गावाकडून शहराकडे रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. विशेषतः ज्या ठिकाणी पाण्याची शाश्वत उपलब्धता नाही अशा ठिकाणी शेती योग्य पद्धतीने पिकत नसल्याने तेथील बहुतांशी तरुण वर्ग हा शहरामध्ये रोजगाराच्या निमित्ताने गर्दी करतो. शहरात रोजगाराच्या वेगवेगळ्या आणि असंख्य संधी उपलब्ध असल्याने कायमच गावाकडून शहराकडे जाण्याचा ट्रेंड पाहायला मिळाला आहे.

हे पण वाचा :- Business Idea : फक्त एकदा गुंतवणूक आणि मग पैसाच- पैसा; जाणून घ्या ‘हा’ सुपरहिट व्यवसाय

मात्र, असे असले तरी काही तरुणांनी शहरातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून, काहींनी आपला स्वतःचा हक्काचा शहरातला व्यवसाय सोडून गावाकडे येत शेती करत लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड येथील तरुणाने देखील अशीच काहीशी किमया साधली आहे. अखिल पटेल असं या तरुणाचं नाव असून तो मुंबईमध्ये व्यवसाय करायचा.

मात्र गावाकडची ओढ या पठ्ठ्याला काही मुंबईमध्ये राहू देईना. मग काय मनाच्या शांततेसाठी समाधानासाठी या पठ्याने आपला मुंबई मधला व्यवसाय गुंडाळला आणि थेट गावी येत शेती करू लागला. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकऱ्यांप्रमाणे आता हा तरुण आधुनिक शेती करू लागला आहे आणि अवघ्या तीन महिन्यात चार लाखांची कमाई या पठ्ठ्याने शेतीतून काढली आहे.

हे पण वाचा :- Uddhav Thackeray : ‘तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी ठाकरेंपासून शिवसेना कुणी तोडू शकत नाही’

यामुळे सध्या पटेल यांची परिसरात चर्चा पहावयास मिळत आहे. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुंबईमध्ये मिठाचा व्यवसाय होता त्यांना वार्षिक दहा ते पंधरा लाख रुपये यातून सहज कमाई होत होती. मात्र अपेक्षित असं समाधान त्या ठिकाणी त्यांना लाभलं नाही. परिणामी, त्यांनी गावी परतत शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि शेतीमधून देखील हा पट्ट्या आता लाखो रुपयांची कमाई काढत आहे.

ते सध्या स्थितीला गावाकडील तीन एकर इनामी जमीन कसत आहेत. गेल्या वर्षीपासून त्यांनी टरबूज या पिकाची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे आता टरबूज लागवड त्यांच्यासाठी फायद्याची ठरत असून लाखों रुपयांची कमाई त्यांना मिळत आहे. अखिल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 10 जानेवारी रोजी टरबुजाची लागवड केली होती. जवळपास पावणेतीन एकर जमिनीवर कलिंगड लागवड त्यांनी केली.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, उन्हाळी हंगामात ‘या’ भाजीपाला पिकांची शेती सुरू करा; चांगली कमाई होणार, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला

आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला यासाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन प्रणाली, विद्राव्य खतांचा वापर करण्यात आला. खतांचा संतुलित प्रमाणे वापर केल्याने पीक चांगले जोमदार बहरले. खर्च पावणेतीन एकरासाठी दोन लाखांपर्यंत आला अस अखिल नमूद करतात. दरम्यान आता त्यांना यातून चांगले उत्पादन मिळाल आहे. 20 मार्च रोजी म्हणजेच सात दिवसांपूर्वी या त्यांच्या कलिंगड पिकातून पहिली तोडणी किंवा तोडा काढण्यात आला आहे. विशेष बाब अशी की एक नंबरचा हा पहिला तोडा त्यांना तब्बल साडेचार लाख रुपये देऊन गेला आहे.

आणखी दोन नंबरचा माल त्यांच्या शेतात आहे यामुळे कमाईचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. जवळपास अजून दीड लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा अखिल यांना असून पावणेतीन एकर शेत जमिनीतून जवळपास सहा लाखांची कमाई, म्हणजेच खर्च वजा जाता त्यांना चार लाख रुपये निव्वळ नफा या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन महिन्यात 60 टन टरबूज उत्पादन मिळाले असून व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे माल थेट सुरत आणि कोलकत्याच्या बाजारपेठेत पाठवण्यात आला आहे.

त्यांच्या टरबूजला मात्र आठ ते दहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. निश्चितच अखिल पटेल यांचा हा शेती मधला नवखा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही, शिवाय हा प्रयोग इतर प्रयोगशील आणि तरुण शेतकऱ्यांना विशेष प्रेरित करणारा राहणार आहे.

हे पण वाचा :- सोयाबीन उत्पादकांना लवकरच मिळणार गोड बातमी; दरात ‘या’ एका कारणामुळे होणार वाढ, पहा तज्ज्ञांचा अंदाज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe