Farmer Success Story: शेतकरी कन्येने 15 लाख रुपये पॅकेजेची सोडली नोकरी आणि सुरू केली भाजीपाला शेती! करते कोट्यावधीची कमाई

Published on -

Farmer Success Story::- चांगले शिक्षण घेऊन एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये भक्कम अशा पॅकेजेची नोकरी मिळवणे हे प्रामुख्याने तरुण-तरुणींचे उद्दिष्ट असते. मुळातच आपण ज्या ही क्षेत्रामध्ये किंवा ज्याही शाखेत शिक्षण घेतो त्या शाखेच्या अनुरूप आपल्याला नोकरी किंवा आपले भविष्यकालीन प्लॅनिंग च्या दृष्टिकोनातून शिक्षण घेतो आणि त्या पद्धतीचे नोकरी मिळाल्यावर आपण जीवनात सेटल झालो असं समजतो व त्या पद्धतीनेच आपण जीवन जगत असतो.

परंतु बऱ्याचदा काही कारणास्तव किंवा काही उच्च ध्येय गाठण्याच्या उद्देशाने काही तरुण किंवा तरुणी या उच्च पॅकेजच्या नोकऱ्या सोडतात व एखाद्या व्यवसायात उडी घेतात. अखंड प्रयत्न व प्रचंड चिकाटीच्या जोरावर ते व्यवसायामध्ये अनन्यसाधारण असे यश मिळवतात. यामागे ध्येयाप्रत पोहोचण्याची जिद्द, त्यासाठी करावे लागणारे कष्ट व अखंड संघर्ष खूप महत्त्वाचा असतो. त्यातल्या त्यात दहा ते पंधरा लाख रुपये पॅकेजचे नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायात उडी घेणे म्हणजे खूप जोखमीचे काम आहे.

निसर्गावर अवलंबून असणारी शेती कायम बेभरवशाचा व्यवसाय म्हणून ओळखली जाते. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती शेतीमध्ये आल्यामुळे शेती आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जाते व आत्ताचे तरुण देखील आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे पाहतात.बरेच तरुण-तरुणी आता शेतीमध्ये उतरत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शेती करत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यातील कुरुड तालुक्यातील चारमुडिया या गावच्या स्मरिका नावाच्या तरुणीचा विचार केला तर वडिलांचे प्रकृती खालावल्यामुळे 2020 मध्ये तिने आयटी कंपनीतील नोकरी सोडली व शेती करायला सुरुवात केली व याच शेतीतून ते आता कोट्यावधी रुपये कमावत आहे.

 स्मरिकाची यशोगाथा

छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्यातील स्मारकाने रायपूर मधून कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केले. त्यानंतर पुणे या ठिकाणी येऊन एमबीए पूर्ण केले. अशाप्रकारे उच्च शिक्षण घेऊन ती एका आयटी कंपनीमध्ये रुजू झाली. कंपनीमध्ये तिला 15 लाखांची नोकरी मिळाली. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये घरी वडिलांची प्रकृती खराब झाल्यामुळे ती गावी परत आली व हे 2020 मध्ये वडिलांच्या मदतीने 23 एकर क्षेत्रावर भाजीपाल्याची शेती सुरू केली.

शेतीत येण्या अगोदर तिने शेती नेमकी काय असते हे पूर्ण समजून घेतले व याकरिता कृषी क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे सुरू केले व त्याचा तिला शेतीमध्ये खूप मोठा फायदा झाला. जमिनीची गुणवत्ता काय असते व त्यानुसार कोणत्या बियाण्यांची व पिकांची निवड करावी इथपासून तिने अभ्यास केला.

याच जोरावरती दररोज 12 टन टोमॅटो व 8 टन वांग्याचे उत्पादन घेत आहे. तिने पिकवलेला हा भाजीपाला ती देशातील विविध राज्यांमध्ये विक्री करते. एवढेच नाही तर तिने ऑनलाईन प्लेटफॉर्मचा वापर देखील करायला सुरुवात केली असून अनेक प्रकारच्या भाज्यांची विक्री आणि पुरवठा ती ऑनलाईन माध्यमातून ऑर्डर घेऊन करते.

आजमीतिला समरिकाची वार्षिक उलाढाल पाहिली तर ती एक कोटींपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे तिने या तिच्या शेती व्यवसायामध्ये तब्बल 150 लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे. तिच्या वडिलांचे आजारपणामुळे तिने शेती करण्याचा निर्णय घेतला व ती आता तिच्या पूर्ण कामांमध्ये समाधानी असल्याचे देखील स्मरिका आवर्जून सांगते.

अशा प्रकारे शेतीमध्ये देखील विविध तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य मार्गदर्शन घेऊन जर सुरुवात केली तर हा व्यवसाय तुम्हाला खूप काही देऊ शकतो हे सिद्ध होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News