Good News : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याने खिडर्डी येथील भाऊसाहेब पारखे यांच्या लढ्याला अखेर यश प्राप्त झाले, अशी माहिती भाऊसाहेब पारखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असूनही राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नव्हता.

या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी तालुक्यातील खिर्डी येथील शेतकरी भाऊसाहेब पारखे यांनी १ सप्टेंबर २०२२ रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या मध्यमातून त्यांना ८७,३४० रूपयांचा लाभ झाला आहे. तर कांताबाई हरिभाऊ हळनोर (मयत) यांच्या वारसांना देखील ४३,९४७ रूपयांचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळाला आहे.
३० जून २०१६ मध्ये थकीत असलेले मुद्दल आणि त्यावरील व्याजासह १.५ लाख रूपये मर्यादिपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्यण घेतण्यात आला होता. त्यानुसार लाभधारक शेतकऱ्यांच्या याद्या ही तयार करण्यात आल्या होत्या.
येथील शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे व कांताबाई हळनोर (मयत) याचे वारस साहेबराव हळनोर यांनी खिडीं सोसायटीकडून पीक कर्ज व संकरीत गाय कर्ज घेतले होते. घेतलेले हे कर्ज योजनेननुसार पात्र ठरल्यामुळे
शासनाच्या पोर्टलवर अपलोड ही करण्यात आले होते. मात्र, पोर्टल बंद असल्या कारणाने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
या संदर्भात लहू कानडे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी देखील मांडली होती. पारखे यांनी या योजनेचा पाठ पुराव करत न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. अजित काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर अॅड. अजित काळे यांनी चार वर्ष युक्तीवाद करत पारखे यांना न्याय मिळून दिला आहे. आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पारखे यांनी सांगितले.