Farming Business Ideas :- मिरची म्हणलं की आपल्या झणझणीत तिखट चव आठवण येते. चवदार आणि मसालेदार पदार्थ चाखायचे असतील तर त्यात मिरची ही पाहिजेच पाहिजे.मग त्यात मांसाहारी किंवा शाकाहारी जेवण असो त्या पदार्थांना मिरची शिवाय चव नाही.
मिरची ही आरोग्यदायी गुणधर्माने समृद्ध आहे. त्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन ए ,सी , फॉस्फरस , कॅल्शियम आढळतात. मिरची आपल्या आहारातील प्रमुख भाग आहे. मिरचीचा वापर मसाल्यांसाठी तर केला जातो पण मिरची ही औषधी लोणच्यासाठी देखील वापरली जाते.

भाजीपाला लागवडीत मिरचीला बाजारात वर्षभर मागणी राहते. म्हणून त्याची लागवड करून कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल. हे पाहणे गरजेचे आहे
भारताला मसाल्यांचा देश म्हणून ओळखले जाते. भारतातील शेतकरी लाल मिरची , शिमला मिरची आणि हिरवी मिरची याची लागवड करतात.
देशात राजस्थान , महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र प्रदेश , ओरिसा , तामिळनाडू , बिहार आणि उत्तर प्रदेश ही प्रामुख्याने मिरची उत्पादक राज्य आहेत.
मिरची पिकासाठी हवामान
मिरचीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य असते.
मिरची लागवडीसाठी इष्टतम तापमान 15 – 35 अंश सेल्सिअस असते. तर मिरची ही वनस्पती 100 सेमी
पाऊस असलेल्या भागात वाढू शकते.
मिरची पिकासाठी माती निवड
सुपीक कसदार व पाण्याचा निचरा होणारी. म्हणजे
ज्या माती चा पीएच मूल्य 6.5 ते 7.5 आहे .
ज्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते ती माती मिरची पिकासाठी पोषक असते.
लागवड कार्यकाळ
मिरचीसाठी उन्हाळी व पावसाळी या दोन्ही हंगामात लागवड केली जाते. उन्हाळी मिरचीसाठी फेब्रुवारी- मार्च पेरणी करावी ,पीक काढणीसाठी मार्च – एप्रिल
हा काळ तर , पावसाळी मिरचीसाठी मे-जून मध्ये पेरणी करावी तर काढणीसाठी जून-जुलै हा काळ आहे.
जमीन मशागत आणि लागवड
जमीन 2-3 वेळा नांगरून घेऊन त्यात शेणखत किंवा कुजलेल्या जैविक खत 10 ते 12 टन प्रति एकरी टाकून जमिन समतल करून घ्यावी.
सुधारित वाण निवड
संकरित सुधारित वाणांची निवड केल्यास उत्पादन अधिक मिळते. ज्या त्या प्रदेशानुसार मिरचीच्या वाणांची निवड केलेली जास्तीत जास्त फायद्याचे ठरते.
पाणी व खत नियोजन
मिरची पिकाला जमिनीच्या गुणवत्तेनुसार व मिरची पिकाला फुले व फळी यावेळी पाणी देणे गरजेचे असते या अवस्थेत पाण्याचे नियोजन न झाल्यास फुले व फळे पाण्याअभावी गळतात.
रोग नियंत्रण व्यवस्थापन
रोग नियंत्रणासाठी मिरची लागवड करताना बियाणे यांची योग्य ती रोग नियंत्रण प्रक्रिया करावी त्यामुळे निरोगी रोपांची निर्मिती होती. रोगग्रस्त झाडे शेतातून उपटून टाकावी. मिरचीवर प्रामुख्याने बुरशी जिवाणू , जांबलानी रोगांचा प्रादुर्भाव होतो.
मिरची पिकात किट थ्रीप्स, व्हाईटफ्लाय आणि माइट हे रोग प्रमुख आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५ किंवा मेटासिस्टॉक १ लिटर ७०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करण्यात यावी.
लागवड खर्च आणि उत्पादन
हिरवी मिरचीतून एकरी सरासरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो तर उत्तर त्याचे उत्पादन 60 क्विंटलपर्यंत निघते किरकोळ बाजारात 40 रुपये किलोने विक्री झाल्यास शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.